मी खरंच भाग्यवान! पियुष रानडेची तिसरी बायको झाल्यानंतर सुरूची अडारकरची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आधीच दोन लग्न मोडलेल्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या सुरूचीला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.
मुंबई, 07 डिसेंबर : का रे दुरावा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरूची अडारकर हिनं नुकतंच अभिनेता पियुष रानडे बरोबर लग्न केलं. घरची मंडळी आणि मोजक्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये दोघांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानं चाहत्यानं सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे सुरूची ही पियुषची तिसरी पत्नी आहे. पियुषची या आधी दोन लग्न झालीत. पण दुर्देवानं त्याची दोन्ही लग्न टिकू शकली नाहीत. दरम्यान पियुषची तिसरी पत्नी झालेल्या सुरूचीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुरूचीनं स्वत:ला भाग्यवान म्हटलं आहे. पियुषबरोबर लग्न झाल्यानंतर सुरूची नेमकं काय म्हणाली आहे पाहूया.
अभिनेता पियुष रानडेचं पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याबरोबर झालं होतं. दोघांचं लग्न काहीकाळ टिकू शकलं. दोघांच्या घटस्फोटानंतर चार वर्षांनी पियुषनं अस्मिता फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याशी लग्न केलं. अस्मिता या मालिकेदरम्यान दोघे एमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र त्यांचंही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. मयुरी वाघबरोबर घटस्फोट झाल्यानंतर पियुषनं अभिनेत्री सुरूची अडारकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
आधीच दोन लग्न मोडलेल्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या सुरूचीला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण दोघांच्या लग्नाची किंवा अफेरची अजिबात चर्चा नव्हती.
advertisement
advertisement
दरम्यान पियुषबरोबर लग्न झाल्यानंतर सुरूचीनं इ-टाइम्सची बातचीत करताना सांगितलं, "मी प्रचंड आनंदी आहे. या क्षणी मला काय वाटत आहे त्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला हे सगळं स्वप्नवत वाटत आहे. खरं सांगायचं तर हे सगळं मॅजिकल आहे. पियुष सारखा माणूस माझ्या आयुष्यात आला. मी खूप भाग्यवान आहे. तो अतिशय भावनिक, काळजी घेणारा आहे. मी भाग्यवान आहे की मला पियुष सारखा जोडीदार भेटला".
advertisement
लग्नानंतर पियुष आणि सुरूचीनं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. लग्न विधी आणि रिसेप्शनचे फोटो त्यांनी शेअर केलेत. दोघेही लग्नात प्रचंड खूश असल्याचं दिसत आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुरूची आणि पियुष यांनी अंजली या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्याचप्रमाणे बाईपण भारी देव या सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2023 12:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मी खरंच भाग्यवान! पियुष रानडेची तिसरी बायको झाल्यानंतर सुरूची अडारकरची पहिली प्रतिक्रिया