दोन्ही हात हवेत, बाईक सुसाट; 71 वर्षांच्या अभिनेत्याचा हायवेवर खतरनाक स्टंट, VIDEO

Last Updated:

Actor Bike Stunt Video : अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 71 व्या वर्षी अभिनेत्याचा हा खतरनाक स्टंट पाहून सगळेच अवाक् झालेत.

News18
News18
स्पोर्ट बाईक्स चालवणं, त्यावर बसून भर रस्त्यात स्टंट करणं ही आजकालच्या तरुणाईमध्ये सुरू असलेली सामान्य गोष्ट आहे. तरुणांचं ठीक आहे पण इथे एका 71 वर्षांच्या अभिनेत्यालाही बाईकवर स्टंट करण्याचा मोह आवरला नाही. अभिनेता थेट भर रस्त्यात बाईकवरच उभा राहिला. अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पण या वयात असा स्टंट करणं आणि त्याचा व्हिडीओ काढणं अभिनेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. वाहतूक पोलिसांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली असून अभिनेत्यानं सर्वांसमोर माफी मागितली आहे.
व्हिडीओमध्ये बाईकवर स्टंट करणारा हा अभिनेता टिकू तलसानिया आहेत. ते आता 71 वर्षांचे आहे. या वयातही त्यांनी भर रस्त्यात बाईकवर स्टंट करण्याचं धाडस दाखवलं. टिकू तलसानियाबरोबरच 39 वर्षीय अभिनेत्री मानसी पारेख हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा रस्त्यावर बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
advertisement

'मिसरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टंट

'मिसरी' या गुजराती सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. या क्लिपमध्ये मानसी पारेख चालत्या बाईकवर 'टायटॅनिक' पोज देताना दिसते, तर टिकू तलसानिया चालत्या बाईकवर उभे असल्याचं दिसलं. रस्त्यावर ट्रॅफिक असताना असा व्हिडीओ शूट करण्यात आला त्यामुळे त्यांच्या तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
advertisement

पोलिसांनी केली कडक कारवाई

या व्हिडिओनंतर अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी दोन्ही कलाकारांविरुद्ध एफआयआर दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की 'A विभाग' वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 11191051250588/2025 नोंदवला आहे. हा गुन्हा IPC कलम 281 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 177 आणि 184 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार, बेदरकार वाहन चालवणे आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या व्हिडीओमध्ये टीकू तलसानिया यांच्याबरोबर इतक कलाकारांनाही जाहिर माफी मागितली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दोन्ही हात हवेत, बाईक सुसाट; 71 वर्षांच्या अभिनेत्याचा हायवेवर खतरनाक स्टंट, VIDEO
Next Article