75 आया 75 मुलं अन् 2 स्क्रिन, पुण्यात 'उत्तर'चा अनोखा प्रयोग, शेवट पाहून तुम्हालाही रडू आवरणार नाही, VIDEO

Last Updated:

'उत्तर' सिनेमाने पुण्यात 75 जेन झी मुलं आणि त्यांच्या आयांसाठी वेगळ्या स्क्रीनवर खास प्रयोग केला. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहे.

News18
News18
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक मराठी सिनेमे रिलीज झालेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे उत्तर. या सिनेमा प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. नातेसंबंध, भावना आणि आई-मुलांच्या अतूट नात्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमानं पुण्यात एक आगळा-वेगळा आणि हृदयस्पर्शी प्रयोग घडवून आणला.
'उत्तर'च्या टीमने पुण्यात तब्बल पंच्याहत्तर जेन झी मुलांना मल्टिप्लेक्समधील एका स्क्रीनमध्ये आणि त्यांच्या आयांना दुसऱ्या स्क्रीनमध्ये बसवून सिनेमा दाखवला. या अनोख्या प्रयोगादरम्यान दोन्ही स्क्रीनमध्ये हसू, अश्रू, शांतता, हुंदके अशा साऱ्या भावना अनुभवायला मिळाल्या. सिनेमा संपल्यानंतर भावनांनी भारावून गेलेल्या आयांना त्यांच्या मुलांनी कडकडून मिठी मारली आणि त्या क्षणाने संपूर्ण वातावरण भारावून टाकलं.
advertisement
आजच्या टेक्नॉलॉजीप्रधान जगात आई-मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. अशा वेळी 'उत्तर' हा सिनेमा या नात्याला पुन्हा एकत्र आणणारा ठरत आहे, असं मत या प्रयोगाला उपस्थित असलेल्या सर्व आयांनी व्यक्त केलं. इतर पालकांनीही आपल्या मुलांसोबत हा सिनेमा आवर्जून पाहावा, अशी त्यांनी विनंती केली.
advertisement
आईच्या मनातल्या भावना, तिची तगमग आणि न बोललेलं प्रेम अत्यंत संवेदनशीलपणे मांडणारा 'उत्तर' येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांत कुटुंबासोबत पाहाण्यासारखा सिनेमा असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं.
दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले, "उत्तर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. दोन वेगवेगळ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवण्याचं हे आयोजन संस्मरणीय ठरलं आहे, कारण या प्रयोगाने पंच्याहत्तर मुलं आणि त्यांच्या आयांना कायमस्वरूपी अधिक जवळ आणलं. सुट्टीच्या काळात जास्तीत जास्त पालक आपल्या मुलांसोबत हा पाहायला पाहायला जातील, असा मला पूर्ण विश्वास आहे."
advertisement
उत्तर या सिनेमात अभिनेत्री रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत, या शिवाय पहिल्यांदाच 'अनमिस'नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकलं आहे. दिग्दर्शनासह क्षितिज पटवर्धन यांनी 'उत्तर'ची कथा, पटकथाही लिहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
75 आया 75 मुलं अन् 2 स्क्रिन, पुण्यात 'उत्तर'चा अनोखा प्रयोग, शेवट पाहून तुम्हालाही रडू आवरणार नाही, VIDEO
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement