अरे हे काय! अंगावर एकही कपडा नाही, असाच झाडावर चढला अभिनेता, VIDEO पाहून डोळे बंद करण्याची वेळ

Last Updated:

व्हायरल व्हिडीओमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सरसर भल्यामोठ्या झाडावर चढताना दिसतोय. पण त्याच्या अंगावर एकही कपडा नाहीये. नग्न अवस्थेत तो झाडावर चढला आहे.

News18
News18
कलाकार चाहत्यांना कधी कोणता धक्का देतील, कधी कोणतं सरप्राइज देतीच काही सांगता येत नाही. ते पाहून चाहते देखील चांगलेच शॉक होतात. कधी कोणाच्या ब्रेकअपची बातमी देते तर कधी कोणाच्या लग्नाची नाहीतर बारशाची. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून चाहते चांगलेच शॉक झालेत. व्हिडीओ पाहून डोळे बंद करण्याची वेळ आली आहे.
या व्हिडीओमध्ये या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सरसर भल्यामोठ्या झाडावर चढताना दिसतोय. पण त्याच्या अंगावर एकही कपडा नाहीये. नग्न अवस्थेत तो झाडावर चढला आहे. त्याने त्याचा नग्न अवस्थेत झाडावर चढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याआधी भलीमोठी पोस्टही लिहिली आहे. अभिनेता अशा अवस्थेत झाडावर का चढला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यानं असं करण्यामागचं कारणही सांगितलं.
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच विद्युत जामवाला. आपल्या दमदार अ‍ॅक्शन, जबरदस्त फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. मात्र यावेळी त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांना अक्षरशः धक्का बसला आहे. विद्युत कोणतेही कपडे न घालता झाडावर चढताना दिसतो. हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये विद्युत जामवालनं असं कारण्यामागचं कारणही स्पष्ट केलं.  तो म्हणला, "कलारीपयट्टूचा साधक म्हणून मी दरवर्षी एकदा 'सहज' या योगिक साधनेत स्वतःला झोकून देतो. 'सहज' म्हणजे नैसर्गिक सहजतेच्या आणि स्वाभाविक प्रवृत्तीच्या अवस्थेत परत जाणं. ज्यामुळे निसर्गाशी आणि अंतर्मनाशी अधिक खोल नातं जुळतं."



 










View this post on Instagram























 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)



advertisement
त्याने पुढे लिहिलंय, "शास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर ही साधना शरीरातील अनेक न्यूरोरेसेप्टर्स आणि प्रोप्रीओसेप्टर्स सक्रिय करते. त्यामुळे संवेदनांची जाणीव अधिक तीव्र होते, संतुलन आणि समन्वय सुधारतो. यामुळे शरीराची जागरूकता वाढते, मानसिक एकाग्रता तीव्र होते आणि जमिनीशी घट्ट जोडलेपणाची खोल भावना निर्माण होते."
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी विद्युतच्या निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीचं आणि फिटनेसबाबत त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र सोशल प्लॅटफॉर्मवर अशा स्वरूपाचा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अरे हे काय! अंगावर एकही कपडा नाही, असाच झाडावर चढला अभिनेता, VIDEO पाहून डोळे बंद करण्याची वेळ
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement