भर गर्दीत रश्मिकाला पाहून विजय देवरकोंडाचा कंट्रोल सुटला, लग्नाआधीच केलं असं काही की... सगळे पाहतच पाहिले, VIDEO

Last Updated:

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Video Viral : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

News18
News18
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरु आहेत. दोघांनीही आपलं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं आहे. डेटिंगबाबत त्यांनी आजवर कधीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण आता मात्र त्यांचे बदललेले सूर पाहायला मिळत आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्स करण्याची ते एकही संधी सोडत नाही आहेत. अशातच आता एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. रश्मिका आणि विजय यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
रश्मिका-विजयचा व्हिडीओ व्हायरल
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला असून त्यांनी लग्नाबाबत जास्त बोलणं टाळलं आहे. पण नुकतंच हैदराबाद येथील 'द गर्लफ्रेंड'च्या सक्सेस पार्टीत दोघांनी त्यांच्या कृत्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रश्मिकाच्या नव्या चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी विजय मंचावर पोहोचला तेव्हा साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच होत्या. विजयने यावेळी रश्मिकाचा हात धरला आणि प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. हातावर किस केलं त्यावेळी सर्व कॅमेऱ्यांचे फ्लॅश लाईट्स त्यांच्यावरच होते. सोशल मीडियावर रश्मिका-विजयचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
रश्मिका-विजयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
विजयने रश्मिकाच्या हातावर किस केलं तेव्हा अभिनेत्री लाजली. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अखेर आम्हाला हा क्षण पाहायला मिळाला, आता कळलं खरी गर्लफ्रेंड कोण आहे, अशा पद्धतीच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा रोमँटिक क्षण काही सेकंदाचा असला तरी प्रेक्षकांच्या टाळ्या आणि जल्लोषाने अविस्मरणीय ठरला आहे. अनेकांनी त्यांच्या या कृत्याला पहिला सार्वजनिक इशारा असं म्हटलं आहे. पण तरीही विजय आणि रश्मिकाने याबाबत मौन बाळगलं आहे.
advertisement
'अशी' सुरू झाली लव्हस्टोरी
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 2018 मध्ये 'गीता गोविंदम' आणि 2019 मध्ये 'डियर कॉमरेड' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि विजय यांची चांगली मैत्री झाली. याचवेळी रश्मिकाने कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसोबतचा आपला साखरपुडा तोडला. दरम्यान रश्मिका आणि विजय यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विजय आणि रश्मिका फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
भर गर्दीत रश्मिकाला पाहून विजय देवरकोंडाचा कंट्रोल सुटला, लग्नाआधीच केलं असं काही की... सगळे पाहतच पाहिले, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement