भारतात 'तो' झेंडा फडकवणं गुन्हाच, रंग पाहून भडकू नका; एका छोट्या फरकामुळे होतोय मोठा गोंधळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हिरव्या झेंड्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनेकजण याला पाकिस्तानचा झेंडा समजत असले तरी, इस्लामिक झेंडा आणि पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात महत्त्वाचा फरक आहे जो समजून घेणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यापासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात काही लोक हिरव्या रंगाच्या झेंड्यासोबत दिसत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानबद्दल प्रचंड संताप आहे. लोक पाकिस्तानला आणि तेथील दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानविरोधी निदर्शनांदरम्यान अनेकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवला. तर काही लोक अशाच दिसणाऱ्या झेंड्यासोबत दिसले.
आता सोशल मीडियावर काही लोक आरोप करत आहेत की काही लोक पाकिस्तानचे समर्थन करत आहेत आणि त्याचा झेंडा फडकवत आहेत. तर काही लोकांचे म्हणणे आहे की हा इस्लामिक झेंडा आहे. पाकिस्तानचा झेंडा आणि इस्लामिक झेंडा यांच्यात काय फरक आहे आणि ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत, हे जाणून घेऊया.
advertisement
सर्वात आधी हे लक्षात घ्या की हिरव्या कपड्यावर चंद्र-तारे असण्याचा अर्थ तो पाकिस्तानी झेंडा आहे असे नाही. तसेच केवळ हिरव्या रंगाला पाकिस्तानशी जोडणे योग्य नाही.
आता यातील फरकाबद्दल सांगायचे झाल्यास- पाकिस्तानच्या झेंड्याचा रंग गडद हिरवा असतो. तर इस्लामिक झेंड्याचा रंग तुलनेने फिकट असू शकतो. पाकिस्तानी झेंड्यामध्ये चंद्रकोर तिरकी असते आणि तिच्या समोर तारा असतो. याउलट इस्लामिक झेंड्यामध्ये चंद्रकोर सरळ असू शकते आणि ती तिरकी नसते. पाकिस्तानच्या झेंड्याच्या एका बाजूला पांढरी पट्टी (स्ट्रिप) देखील असते.
advertisement
भारतात इस्लामिक झेंडा आणि पाकिस्तानी झेंडा एकच समजण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा असा गोंधळ आणि गैरसमज निर्माण केला गेला आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवणे बेकायदेशीर आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
भारतात 'तो' झेंडा फडकवणं गुन्हाच, रंग पाहून भडकू नका; एका छोट्या फरकामुळे होतोय मोठा गोंधळ


