जगातील सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकूनच झोप उडेल तुमची! इतक्या पैशांत येईल आलिशान घर, गाडी, दागिने...

Last Updated:

जूलिएट गुलाब जगातील सर्वात महागडा गुलाब आहे. याची किंमत 90 कोटींपर्यंत असू शकते. हा गुलाब 15 वर्षांच्या संशोधनानंतर तयार झाला आहे.

News18
News18
फेब्रुवारी महिना म्हटलं की, प्रेमाचा महिना! कारण या महिन्यात प्रेमी युगुल अनेक खास दिवस साजरे करतात, जे थेट हृदयाशी जोडलेले असतात. या महिन्याची सुरुवात व्हॅलेंटाईन आठवड्याने होते आणि 7 फेब्रुवारीला 'रोज डे' म्हणजेच गुलाब दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खास गुलाब खरेदी करतात, विशेषतः लाल गुलाब देणं हे प्रेम व्यक्त करण्याचं प्रतीक मानलं जातं.
व्हॅलेंटाईनसाठी गुलाबांची मागणी वाढते!
गुलाब वेगवेगळ्या रंगात आणि सुवासात उपलब्ध आहेत. पण व्हॅलेंटाईन डेला विशेषतः लाल गुलाबाची मागणी प्रचंड वाढते. या काळात गुलाबांची किंमत गगनाला भिडते. साध्या दिवशी 20-30 रुपयांना मिळणारा गुलाब रोज डे किंवा व्हॅलेंटाईन डेला 100-200 रुपयांना विकला जातो. पण प्रेम व्यक्त करायचं असेल, तर कोण पैशांची काळजी करतं?
advertisement
जगातील सर्वात महागडं गुलाब कोणतं?
तुम्ही कधी 20, 30 किंवा 100-200 रुपयांत गुलाब विकत घेतला असेल. पण तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात महागडं गुलाब कोणतं आहे? आणि त्याची किंमत किती आहे? हे गुलाब इतक्या महागड्या किमतीत विकलं जातं की त्याच्या किंमतीत माणूस एक आलिशान घरही विकत घेऊ शकतो!
ज्युलियट रोज – जगातील सर्वात महागडं गुलाब
जगातील सर्वात महागडं गुलाब म्हणजे ज्युलियट रोज (Juliet Rose). हे गुलाब सहजासहजी उगवत नाही, त्याचं संवर्धन करायला खूप वेळ आणि मेहनत लागते. प्रसिद्ध फ्लॉरिस्ट डेव्हिड ऑस्टिन यांनी या गुलाबाचा शोध लावला होता. त्यांनी अनेक गुलाबांच्या जाती मिसळून ज्युलियट रोज तयार केलं. Apricot-Hued Hybrid नावाच्या या दुर्मिळ जातीचं फूल तयार करण्यासाठी तब्बल 15 वर्षे लागली होती.
advertisement
ज्युलियट रोजची अविश्वसनीय किंमत!
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 2006 मध्ये हे गुलाब तब्बल 10 मिलियन पाउंड्स (सुमारे 90 कोटी रुपये) ला विकलं गेलं होतं! आणि आता 2024 मध्ये या गुलाबाची किंमत जवळपास 15.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 131 कोटी रुपये झाली आहे.
ज्युलियट रोजचं वैशिष्ट्य
हे गुलाब केवळ महाग नाही तर ते अतिशय सुंदर आणि सुगंधीही आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल 3 वर्षांपर्यंत न सुकता ताजं राहतं! त्यामुळेच ते जगातील सर्वात खास गुलाब मानलं जातं. ज्युलियट रोजसोबतच कुडुपल फ्लॉवर हेही अतिशय महागडं आणि दुर्मिळ फूल मानलं जातं. हे फूल फक्त श्रीलंकेत सापडतं आणि फक्त रात्रीच फुलतं. जगभरात गुलाबाच्या 150 हून अधिक जाती आहेत, पण ज्युलियट रोजसारखी सौंदर्यवान आणि महागडी जात क्वचितच सापडते.
advertisement
व्हॅलेंटाईन डेला प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही गुलाब विकत घेतलात का? आणि जर ज्युलियट रोज तुमच्या हातात आलं, तर त्याची किंमत मोजण्याची तयारी आहे का?
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
जगातील सर्वात महाग गुलाब, किंमत ऐकूनच झोप उडेल तुमची! इतक्या पैशांत येईल आलिशान घर, गाडी, दागिने...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement