बॅले डान्स सुरू असताना ती एक चूक पडली महागात, नाइट क्लबमध्ये कशी लागली आग? 25 लोकांच्या मृत्यूचा Shocking VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोव्यातील अर्पोरा गावातील नाइट क्लबमध्ये इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकरमुळे लागलेल्या आगीत २५ पर्यटकांचा मृत्यू, अवैध बांधकाम आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उजागर.
मजा करण्यासाठी गोव्याच्या नाइट क्लबमध्ये गेलेल्या पर्यटकांसाठी रात्र काळ ठरली. भयंकर आगीत स्टाफसह 25 पर्यटकांचा होरपळून मृत्यू झाला. सिलेंडरचा स्फोट नसून गोव्यातील नाइट क्लब आगीमागचं खरं कारण समोर आलं आहे. एका व्हिडीओमधून ही आग कशी लागली ते स्पष्ट दिसत आहे. गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये आग लागण्याची घटना केवळ एक अपघात नसून, एका लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकरमुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं.
ज्यावेळी क्लबमध्ये ही दुर्घटना घडली, त्यावेळी बेली डान्सर आणि म्युझिक बँडचा लाईव्ह परफॉर्मन्स सुरू होता. याच परफॉर्मन्समध्ये इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकरचा वापर करण्यात आला होता. या फटाक्यांमधून निघालेली आगीची चिंगारी क्लबच्या छताच्या वरच्या भागापर्यंत पोहोचली. हा निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या नियमामांचं उल्लंघन करणं किती जीवघेणं ठरू शकतं हे या व्हिडीओमधून दिसत आहे.
advertisement
छतावर आग लागली आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ती संपूर्ण नाइट क्लबमध्ये पसरली. लोकांनी आरडाओरडा केला, जीव वाचवण्यासाठी पळाले, मात्र स्टाफ, पर्यटक मिळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आग पसरण्यामागे आणखी एक करण म्हणजे नाइट क्लबच्या भिंती आणि छत बांबूच्या लाकडी पट्ट्या वापरून बनवलेलं होतं. इलेक्ट्रॉनिक फटाक्याची चिंगारी या बांबूच्या लाकडी छताला लागताच आग खूप वेगाने पसरली. ज्वलनशील साहित्य वापरल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि मोठी दुर्घटना घडली.
advertisement
गोव्यातील अग्निकांडाबद्दल माहिती देताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, गोव्यातील नाईटक्लबमध्ये काही क्षणातच मृतदेहांचा खच पडला होता. उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईटक्लबमध्ये आग लागली तेव्हा किमान १०० लोक डान्स फ्लोअरवर डान्स करत होते. आग लागताच काहीजण किचनच्या दिशेनं पळाले, जे किचनमध्ये कर्मचाऱ्यांसह अडकले आणि यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
advertisement
आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे क्लबमधील लोकांची मोठी धावपळ उडाली. या दुर्घटनेत दुर्दैवाने बेसमेंटमध्ये धूर भरल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. आगीपेक्षा जास्त लोकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे नाईट क्लब, रेस्टॉरंट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत धूर बाहेर काढण्यासाठी योग्य व्यवस्था असणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी या नाइट क्लबचं काम अवैध असल्यानं त्याला पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र कायद्याची दिशाभूल करुन आणि नोटीसला केराची टोपली दाखवून हा नाइट क्लब सुरू होता. या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Goa
First Published :
December 08, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/गोवा/
बॅले डान्स सुरू असताना ती एक चूक पडली महागात, नाइट क्लबमध्ये कशी लागली आग? 25 लोकांच्या मृत्यूचा Shocking VIDEO


