डोंबिवलीच्या अन्वीचं 'सागरी' यश; दहाव्या वाढदिवशी स्वतःलाच दिली अनोखी भेट, जाणून वाटेल कौतुक

Last Updated:

Dombivli News : डोंबिवलीच्या अवघ्या 10 वर्षांच्या अन्वी शैलेश सुवर्णाने मोठा पराक्रम केला. तिने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचे सागरी अंतर फक्त 2 तास 44 मिनिटांत पोहून पूर्ण केले आणि नवा विक्रम नोंदवला.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवली येथे राहणारी अन्वी शैलेश सुवर्णा ही केवळ 10 वर्षांची आहे. खेळण्याच्या वयात तिने आपल्या प्रचंड जिद्दीच्या बळावर एक मोठा पराक्रम केला. 21 नोव्हेंबर 2025 रोजी तिने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचे सागरी अंतर फक्त 2 तास 44 मिनिटांत पोहून पूर्ण केले आणि एक नवा विक्रम रचलेला आहे.
हा विक्रम तिने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केला. २७ नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस असतो आणि यंदाचा वाढदिवस तिने स्वतःला एक अनोखी आणि अविस्मरणीय भेट देऊन साजरा करण्याचे ठरवले.
रात्रीची तयारी आणि पहाटेचा प्रवास
अन्वीची आई यांनी या विक्रमाच्या आठवणी त्यांच्या मनात जपल्या आहेत. वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असल्याने, अन्वीच्या कुटुंबातील सात सदस्य, एक निरीक्षक आणि तिचे दोन प्रशिक्षक असे सर्वजण गुरुवारी रात्री 9 वाजता डोंबिवलीतून मोरा जेट्टी येथे पोहोचले. तिथून बोटीने प्रवास करत ते रात्री 2 वाजता अटल सेतू जवळ समुद्रावर पोहोचले.
advertisement
पहाटे 2.26 वाजता अन्वी समुद्रात उतरली त्यानंतर पहाटे 5.11 मिनिटांनी ती गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. तिने तब्बल 17 किलोमीटरचे अंतर केवळ 2 तास 44 मिनिटांत पार करून नवा विक्रम नोंदवला आहे.
जिद्द आणि आत्मविश्वास
या कमी वयात खडतर समुद्रातून प्रवास केल्यामुळे अन्वीचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. तिची आई सौम्या यांनाही आपल्या लेकीचा खूप अभिमान वाटतो. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत थंडीचा जोर वाढलेला असतानाही वाढदिवसाला हे अंतर पोहूनच जायचे असा पक्का निर्धार अन्वीने केला होता. तिने त्याची मानसिक तयारी पूर्ण केली होती.
advertisement
लहानपणापासूनची आवड
डोंबिवलीची असली तरी अन्वी मूळची दक्षिण मंगळूरूची आहे. तिच्या वडिलांचे घर समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने तिला लहानपणापासूनच पाण्याची भीती नाही. विशेष म्हणजे ती फक्त दीड वर्षांची असतानाच पोहायला शिकली होती.
पुढील लक्ष्य 40 किलोमीटर
17 किलोमीटरचा सागरी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अन्वी आता थांबणार नाहीये. तिने आपले पुढील लक्ष्य 40 किलोमीटर सागरी अंतर पोहून पार करण्याचे ठेवले आहे आणि त्यासाठी तिची तयारी सुरु झाली आहे.अन्वी डोंबिवलीतील यश जिमखाना येथील स्वीमिंग पूलमध्ये प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
डोंबिवलीच्या अन्वीचं 'सागरी' यश; दहाव्या वाढदिवशी स्वतःलाच दिली अनोखी भेट, जाणून वाटेल कौतुक
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement