advertisement

Dombivli Shocking Accident : नातवाला सोडून घरी येत होते आजोबा; पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर...डोंबिलीत नेमकं काय घडलं?

Last Updated:

Dombivli East Accident : डोंबिवली शहरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आलेली आहे. जिथे पायी जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला वाहनाने धडक दिली आहे.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकत गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघातात 74 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पूर्वेतील एका सोसायटीत राहणारे हरिश्चंद्र सूर्यवंशी हे दररोजप्रमाणे सकाळी साडेसहाच्या सुमारास नातवाला सोडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे गेले होते. नातवाला स्टेशनवर सोडल्यानंतर ते फुटपाथावरुन पायी घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.
काही सेकंदांतच घडला हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार,अग्रवाल हॉल परिसरात पोहोचल्यावर अचानक एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की सूर्यवंशी रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. तसेच पाठ, उजव्या पायाच्या गुडघ्याला किरकोळ जखमा झाल्या. तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत कंबर दुखापत गंभीर असल्याचे निदर्शनास आणले असून पुढील उपचारांसाठी त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
advertisement
अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र, काहींनी वाहनाचा क्रमांक लिहून ठेवला होता, यानंतर हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनचालक उमेश यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अपघातातील वाहन जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेचा अचूक क्रम समजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Shocking Accident : नातवाला सोडून घरी येत होते आजोबा; पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर...डोंबिलीत नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement