Kalyan Shocking News : मराठी हिंदीचा वाद, 5 जणांनी घेरून मारलं, कल्याणच्या अर्णवसोबत नक्की काय घडलं?

Last Updated:

Kalyan News : लोकल ट्रेनमध्ये मराठी-हिंदीच्या वादानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्याने केली आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

News18
News18
कल्याण : गेल्या काही महिन्यांपासून मराठी विरुद्ध हिंदी हा वाद वारंवार पाहण्यासाठी मिळत आहे. कधी भररस्त्यात हा वाद सुरु होतो तर कधी लोकलमध्येही पण या वादाचे रुपांतर हाणामारी पर्यंत पोहतचे. पण कल्याणमधून या प्रकारचे अतिशय धक्कादायक घटनेत रुपांतर झालेले आहे. नेमके काय झाले आणि हा वाद कोणामध्ये झाला ते सविस्तर जाणून घेऊयात.
हिंदी आणि मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाने जीवन संपवले असून हा धक्कादायक प्रकार कल्याण शहराच्या तिसगाव येथील आहे. जिथे वास्तव्यास असलेल्या अर्णव खैरे हा तरुणाने हा निर्णय घेतला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,अर्णव हा एक महाविद्यालयीन तरुण होता. जो काही दिवसांपूर्वी मुलुंडकडे कॉलेजसाठी लोकल ट्रेनने जात होता. प्रवास करत असताना इतर काही प्रवाशांची त्याचा हिंदी आणि मराठी बोलण्यावरून वाद झाला. पाहता पाहात हा साधा वाद इतक्या टोकाला गेला ती ट्रेनमध्ये असलेल्या चार ते पाच जणांनी अर्णवला जोरदार मारहाण केली. घडलेल्या घटनेत अर्णव गंभीर जखमी झाला शिवाय त्याला मानसिक धक्काही बसला. ट्रेनमध्ये घडलेल्या प्रकाराचा इतका धसका घेतला की त्याने घरी परतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
अर्णवच्या वडिलांची पोलिसांत तक्रार
मयत अर्णव खैरे यांचे वडील जितेंद्र खैरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की,फक्त भाषेच्या वादामुळे माझ्या मुलावर इतकी मारहाण झाली आणि त्यामुळे त्याने जीवन संपवले. आम्हाला न्याय हवा आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केलेली आहेत शिवाय घटनास्थळी साक्षीदारांची माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांनी ही घटना गंभीर मानून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Shocking News : मराठी हिंदीचा वाद, 5 जणांनी घेरून मारलं, कल्याणच्या अर्णवसोबत नक्की काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement