Kalyan : कल्याणकरांनो खरंच विश्वास बसणार नाही, कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेने शोधला नवा उपाय

Last Updated:

KDMC News : महापालिकेने शहरातील कचऱ्याच्या समस्येवर नवा आणि प्रभावी उपाय शोधला आहे. नेमका कोणता उपाय शोधला गेला आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

News18
News18
कल्याण : कल्याण- डोंबिवली शहरात गेल्या काही वर्षात अनेक नागरिकांनी स्थलातर केले त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या ज्यात वाहतूक कोंडी वाढली, त्यामुळेच हवेची गुणवत्ता खराब झाली त्या पाठोपाठ स्वच्छतेचा अभावही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. अखेर या सर्व समस्येवर उपाय म्हणून केडीएमसीने एक मोहिम राबवली आहे. चला तर या बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ.
कल्याणसाठी महापालिकेने उचलले 'हे' मोठे पाऊल
कल्याण अन् डोंबिवली शहराच्या वातावरणात असलेले धूलिकण कमी करण्याच्या उद्देशाने आणि शहराची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केडीएमसीने डीप क्लीनिंग मोहिमेचा शुभारंभ केला आहे. ज्या मोहिमेत साधारण आठ दिवसांच्या या उपक्रमादरम्यान मनपाने शहरातील रस्ते, दुभाजक तसेच मैदानांसह विविध सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता कामे केली आहे, ज्यात साधारण सुमारे शंभर टन कचरा गोळा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, दररोज 8 ते 10 टन कचरा संकलित करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट केली जात आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर राहण्यासाठी नागरिकांचा ही सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
मनपा प्रभाग परिसरात स्थानिक बॅग कारखानदार, व्यावसायिक आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि कचरा व्यवस्थापनात त्यांचा सहभाग वाढविणे यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच, भंगार, स्क्रॅप आणि इतर प्रकारचा कचरा पालिकेच्या कचरा गोळा करणारा ट्रकमध्येच नियमितपणे जमा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. जेणेकरून परिसरात कचऱ्याचा साठा जास्त होऊ नये आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहतील.
advertisement
उपायुक्त कोकरे यांनी नागरिकांना घरगुती कचऱ्याचे ओला आणि सुका वर्गीकरण करूनच कचरा गाडीत देण्याचे आवाहन केले. तसेच फेरीवाले, भाजीवाले, फळ विक्रेते आणि गॅरेजधारक यांनाही आपल्या परिसराची स्वच्छता दिवसभर राखावी, अशी सूचना देण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : कल्याणकरांनो खरंच विश्वास बसणार नाही, कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेने शोधला नवा उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement