Dombivli Crime: नेहमीच्या गिऱ्हाईकानेच केला गेम, दोन महिन्यात लाखोंची खरेदी; ओळखीच्या लोकांनीच सराफाला लुटलं
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Dombivli Crime: डोंबिवलीत एका सराफाला थेट गिऱ्हाईकानेच लाखोंचा गंडा घातला आहे. गिऱ्हाईकाच्या घरी सोनार गेला असत तिथेच त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार घडला आहे.
आजच्या दिवशी सराफा बाजारात सोनं प्रतितोळा 1 लाख 31 हजार 420 रुपये इतके आहे. सोन्याचा भाव गगनाला भिडलेला असताना दररोज कुठे ना कुठेतरी सोने खरेदीबद्दल फसवणूकीच्या बातम्या समोर येताना दिसत आहे. अशातच आता डोंबिवलीतही एका सराफाला थेट गिऱ्हाईकानेच लाखोंचा गंडा घातला आहे. गिऱ्हाईकाच्या घरी सोनार गेला असत तिथेच त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकरणी सराफाने पोलिस स्थानकात धाव घेतली असून गिऱ्हाईकावर गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सराफाच्या दुकानामध्ये गिऱ्हाईक सोनं खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी दोन महिन्यात तब्बल 69 लाख 90 हजारांची खरेदी केली. नेहमीच गिऱ्हाईक असल्यामुळे नंतर पैसे देतो, असं म्हणून ते गिऱ्हाईक थेट ज्वेलर्सच्या दुकानातूनच बाहेर जायचे. खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे घेण्यासाठी सोनार गिऱ्हाईकाच्या घरी गेले होते. गिऱ्हाईकाच्या घरी पैसे आणण्यासाठी गेलेल्या सराफाला दमदाटी करण्यात आली. या संदर्भात सोनाराने डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
advertisement
तक्रार दाखल करत पोलिसांनी त्या गिऱ्हाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन सिंह सुदाना असं त्या ज्वेलर्स मालकाचं नाव आहे. 5 ऑक्टोबर ते 4 डिसेंबर या कालावधीत त्या सोनारासोबत फसवणूकीचा प्रकार घडला. या दोन महिन्यामध्ये त्या गिऱ्हाईकाने तब्बल 69 लाख 90 हजार 480 रूपयाचे दागिने खरेदी केले होते. गिऱ्हाईकाने दुकानगदाराला पैसे दिले नाहीत. तारीख पे तारीख देऊन पैसे देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. या प्रकरणी दुकानदाराने पोलिस स्थानकातच तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. नियमित दुकानामध्ये, सोनं खरेदी करण्यासाठी येणाऱ्या गिऱ्हाईकानेच असा प्रकार केला आहे. त्यामुळे सर्वत्रच चिंता व्यक्त केली जात आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 10, 2025 5:10 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Crime: नेहमीच्या गिऱ्हाईकानेच केला गेम, दोन महिन्यात लाखोंची खरेदी; ओळखीच्या लोकांनीच सराफाला लुटलं










