मोठी बातमी! मुंबई - गोवा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 8 प्रवासी जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे.
रत्नागिरी, 20 डिसेंबर, चंद्रकांत बनकर : रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात कलंडली. या अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कळंबणी गावानजीक हा अपघात झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई - गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबनी गावानजीक पुण्याहून- खेडला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. ही बस महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात कलंडली. या अपघातामध्ये बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे, खेडमधील भरणे नाका या ठिकाणी असणाऱ्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पुणे येथून खेडला हे सर्वजण जात होते, अशी माहिती मिळत आहे. अपघाताचे वृत्त समजतात खेडमधील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व स्वामी नरेंद्र महाराज संस्थान च्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
December 20, 2023 7:44 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
मोठी बातमी! मुंबई - गोवा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 8 प्रवासी जखमी


