सावकारीचा विळखा! महिलेनं कर्ज घेतलं 90 हजारांचं, वसूल केले साडे चार लाख; दोघांविरुद्ध गुन्हा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अवैध सावकारीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परवीन सोहेब मुलानी आणि अकबाल गनी खेरटकर अशी दोघांची नावे आहेत.
चिपळूण, 30 डिसेंबर : चिपळूणमध्ये सावकारी प्रकरण उघडकीस आलं असून एका महिलेला ९० हजारांचे कर्ज दिल्यानंतर तब्बल साडे चार लाख रुपये वसूल कऱण्यात आले आहेत. या प्रकरणी महिलेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अवैध सावकारीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परवीन सोहेब मुलानी आणि अकबाल गनी खेरटकर अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका महिलेने सावकारीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, खासगी सावकारांकडून अडचणीत सापडलेल्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचं यानंतर समोर आलं. सावकार ५ ते ५० टक्के दराने कर्ज देतात आणि त्यावर भरमसाठ व्याज वसूल केले जाते. व्याजाचे पैसे द्यायला उशीर झाला तर कुटुंबाला धमकावण्यासह दमदाटीचे प्रकारही होत असत.
advertisement
सावकारी विरोधात पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात मोहीम राबवत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका महिलेने सावकाराकडून ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जावर जास्त दराने व्याज आकारत सावकाराने थोडेथोडके नव्हे तर साडे चार लाख रुपये वसूल केले. शेवटी सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधितांविरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2023 8:10 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
सावकारीचा विळखा! महिलेनं कर्ज घेतलं 90 हजारांचं, वसूल केले साडे चार लाख; दोघांविरुद्ध गुन्हा