advertisement

Shaniwar Astro: शनिवारी खरेदी करू नयेत या 5 गोष्टी; मानगुटीवर शनिदोष बसला की सुटणं मुश्कील

Last Updated:

Shaniwar Astro: शनिवारी काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे साडेसाती किंवा अडीचकीचा नकारात्मक प्रभाव वाढण्याची शक्यता असते. शनिदेवाशी संबंधित काही गोष्टी शनिवारी खरेदी करणे टाळावे.

News18
News18
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्यावर शनिदेव प्रसन्न असतील तर ते एखाद्या गरिबाला राजा बनवू शकतात, पण ते कोपले तर अडचणी वाढू शकतात. म्हणूनच शनिवारी काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे साडेसाती किंवा अडीचकीचा नकारात्मक प्रभाव वाढण्याची शक्यता असते. शनिदेवाशी संबंधित काही गोष्टी शनिवारी खरेदी करणे टाळावे.
शास्त्रानुसार शनिवारी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते. लोखंडाचा संबंध शनीशी आहे, त्यामुळे या दिवशी लोखंड घरात आणल्याने सुख-शांती भंग होऊ शकते आणि घरात तणाव किंवा कलह निर्माण होऊ शकतो. मात्र या दिवशी लोखंडाचे दान करणे फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला लोखंड दान करायचे असेल, तर ते शनिवारी न खरेदी करता आधीच खरेदी करून ठेवावे.
advertisement
ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी मीठ खरेदी करणे वर्जित आहे. असे मानले जाते की शनिवारी मीठ खरेदी केल्याने आर्थिक समस्या वाढू शकतात आणि व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबू शकते. शनिवारी मिठाचे दान करणे शनिदोष दूर करण्यासाठी उत्तम मानले जाते, पण स्वतःसाठी मीठ शुक्रवारीच आणून ठेवावे.
काळे तीळ शनिदेवाच्या पूजेत वापरले जातात, पण शनिवारी ते खरेदी करणे निषिद्ध मानले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी तीळ खरेदी केल्याने कामात अडथळे येतात. पूजेसाठी काळे तीळ एक दिवस आधीच खरेदी करणे शुभ ठरते.
advertisement
शनि साडेसाती किंवा अडीचकीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र शनिवारी मोहरीचे तेल किंवा कोणतेही खाद्यतेल खरेदी करू नये. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी तेल खरेदी केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
advertisement
शनिवारी काळ्या रंगाचे किंवा चामड्याचे जोडे-चप्पल खरेदी करणे अशुभ मानले जाते. यामुळे जीवनात अडचणी येतात, अपयशाचा सामना करावा लागतो आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
शनिवारी काय खरेदी करणे शुभ - ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी काही गोष्टींची खरेदी केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तुम्ही शनिवारी दान करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता. याशिवाय भगवान शिव किंवा शनिदेवाच्या पूजेचे साहित्य आणि शनिदेवाचे रत्न नीलम खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच तांदूळ, पीठ किंवा इतर धान्य खरेदी करणे देखील फायदेशीर ठरते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shaniwar Astro: शनिवारी खरेदी करू नयेत या 5 गोष्टी; मानगुटीवर शनिदोष बसला की सुटणं मुश्कील
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement