Indian Railways : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे गाड्यांबाबत मोठी अपडेट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
सिंधुदुर्ग, विशाल रेवडेकर, प्रतिनिधी : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र ती आता पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे. 24 तासानंतर अखेर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. रात्री उशिरा ट्रॅकवरील चाचणी पूर्ण झाल्यानंतर मुंबईवरून जाणारी राजधानी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाली.
तर आज सकाळी गोवा येथून सावंतवाडी दिवा एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. काही वेळापूर्वी मुंबई - करमाळी एसी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाली. आता काही वेळातच नियोजित वेळेतील मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरळीत सुरू झाला असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेला पावसाचा मोठा फटका
कोकणामध्ये दोन दिवसांपूर्वी अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या या मध्यचे आडकल्या होत्या. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसला. मात्र आता पावसानं उघडीप दिल्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील रेल्वे वाहतुक सुरळीत सुरू झाली असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
July 11, 2024 10:50 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Indian Railways : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे गाड्यांबाबत मोठी अपडेट


