झोपेची डुलकी पडली 22 लाखाला! कोकण रेल्वेत महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे या ठिकाणी महिलेला जाग आली असता पर्स चोरी झाल्याची बाब लक्षात आली.
चंद्रकांत बनकर, खेड - रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये २२ लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील महिला मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास असताना मडगाव ते विनेरे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान त्यांची बॅग अज्ञाताने चोरून नेली. या बॅगेत हिऱ्याच्या दागि्यांसह रोख रक्कम होती. विनेरे येथे आपली पर्स चोरी झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर रेल्वे पोलिसात याप्रकरणी तक्रार देण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रमा सुरेंद्र माडा या वाशी इथं राहतात. त्या उडपी ते एलटीटी असा प्रवास करत होत्या. मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये बोगी नंबर बी५ मध्ये होत्या. मडगाव रेल्वे स्टेशन ते विनेरे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झोपेमध्ये असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची खाकी रंगाची लेडीज पर्स चोरून नेली. या पर्स मसध्ये रोख रकमेसह 22 लाख 70 हजार 500 रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने होते.
advertisement
पर्समध्ये 45 हजार रुपये रोख रक्कम, चार लाख 50 हजार रुपये किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या, चार लाख रुपये किमतीची सोन्याची चैन आणि हिरेजडीत पेंडेल, चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या आठ बांगड्या, चार लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, चेनला एलिझाबेथ डॉलर पॅडल होते. याशिवाय अन्य सोन्याचे दागिने व त्यासोबत इतर महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली.
advertisement
कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे या ठिकाणी महिलेला जाग आली असता पर्स चोरी झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी या संदर्भात रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तीन फेब्रुवारी रोजी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात भादवि कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये गेल्या वर्षभरात तीन ते चार चोऱ्या झाल्या मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ही सर्वात मोठी चोरी असल्याचे बोलले जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 1:32 PM IST


