advertisement

Gaurav Khanna News: 'आमच्या लग्नात...' 9 वर्षांचा संसार खरंच मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाने सोडलं मौन, गौरव खन्नाबद्दल म्हणाली...

Last Updated:

गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमेला यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा होत्या. पण आता या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

Gaurav Khanna News: 'आमच्या लग्नात...' 9 वर्षांचा संसार खरंच मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाने सोडलं मौन, गौरव खन्नाबद्दल म्हणाली...
Gaurav Khanna News: 'आमच्या लग्नात...' 9 वर्षांचा संसार खरंच मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाने सोडलं मौन, गौरव खन्नाबद्दल म्हणाली...
'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमेला यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा होत्या. पण आता या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. सध्या गौरव खन्ना आणि आकांक्षा चमेलाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. टिव्ही इंडस्ट्रीतील हे फेमस कपल लग्नाच्या 9 वर्षांनंतर त्यांचा संसार मोडणार की काय? अशी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. आकांक्षानेच शेअर केलेल्या पोस्टमुळे सुरू झालेली चर्चा आता तिच्या एका मुलाखतीनंतर बंद झाली आहे. आता यावर चर्चांवर स्वत: गौरवची पत्नी आकांक्षानेच मुलाखतीतून स्पष्टीकरण दिलं आहे.
आकांक्षा चमोलाने ई- टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, "आमच्या नात्यात कोणताच दुरावा आलेला नाही. माझ्या पोस्टचा आणि गौरवचा काहीही संबंध नाही. मी माझ्या सोशल मीडियावर पर्सनल गोष्टींबाबत चर्चा करत नाही. ती पोस्ट माझ्या एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी होती. प्रत्येकाने आपापल्या मर्जीने त्या पोस्टचा अर्थ घ्यायचा होता. मात्र लोकांनी उगाचच नको त्या गोष्टी पसरवल्या आहेत." या मुलाखतीमध्ये आकांक्षा स्पष्टपणे म्हणली आहे की, मी शेअर केलेल्या पोस्टचा आणि माझ्या खासगी आयुष्याचा कोणताही संबंध नाही. सध्या सोशल मीडियावर गौरव खन्ना आणि त्याची पत्नी कमालीची चर्चेत आली आहे.
advertisement
तीन दिवसांपूर्वी आकांक्षाने इन्स्टाग्रामवर "ज्या नात्याचा पाया केवळ गरजेवर आधारलेला असतो, तिथे मन नेहमीच बलिदान देतं.", असं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने अधिक गंभीर विधान करत लिहिले की, "जेव्हा आम्हाला वाटत होतं की, आम्ही तयार आहोत, पण तेव्हा आम्ही तयार नव्हतो", असं तिने म्हटलं होतं. ही पोस्ट तिची सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांतच तिने घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. या पोस्टमुळे आकांक्षाला ट्रोल केलं जात आहे. ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. जरीही तिने सारवासारव केली असली तरीही तिच्या विधानाची चांगलीच चर्चा होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gaurav Khanna News: 'आमच्या लग्नात...' 9 वर्षांचा संसार खरंच मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाने सोडलं मौन, गौरव खन्नाबद्दल म्हणाली...
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement