जिलेटीनचा मोठा साठा जप्त; रत्नागिरीमध्ये खळबळ, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी, शिवाजी गोरे, प्रतिनिधी : रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये तब्बल 153 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीतील मंडणगड शहरात एका ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनचा मोठा साठा आढळून आला आहे. जिलेटिनच्या तब्बल 153 कांड्या सापडल्या आहेत. या प्रकरामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, रतनलाल बाळू रामजी मूळ राहणार चित्तोडगढ राजस्थान येथील व्यक्तीला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. स्फोटक पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 19, 2024 3:37 PM IST


