गुहागरमध्ये विधानसभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी; भास्कर जाधवांची डोकेदुखी वाढणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मनसेकडून गुहागर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, प्रतिनिधी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मनसे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र दुसरीकडे लोकसभेसोबत मनसे सैनिक विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचंही पाहायला मिळत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसे सैनिकांनी तयारी सुरू केली आहे. गुहागरमधून मनसे नेते प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे गुहागरमधून विधानसभेसाठी प्रमोद गांधी यांना तिकीट मिळावं अशी मनसे सैनिकांची इच्छा आहे. त्यासाठी आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रमोद गांधी यांना तिकीट देण्यात यावं अशी आग्रही मागणी मनसे सैनिकांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान मनसेच्या गुहागरमधील एण्ट्रीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची डोकदुखी वाढण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहिती प्रमाणे भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी मनसेकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमोद गांधी यांना तिकीट मिळावं अशी आग्रही मागणी मनसे सैनिकांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे केली आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
November 14, 2023 12:02 PM IST


