महाराष्ट्रातील हे गावं अख्ख 5 दिवसांच्या सुट्टीवर; गावात स्मशान शांतता, काय आहे 450 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही प्रथा?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
तळकोकणात अनेक ठिकाणी प्रथा, रुढी परंपरा पाहायला मिळतात, आज आपण अशाच एका अनोख्या प्रथेची माहिती जाणून घेणार आहोत.
सिंधुदुर्ग, विशाल रेवडेकर, प्रतिनिधी : तळकोकणात अनेक ठिकाणी प्रथा, रुढी परंपरा पाहायला मिळतात, त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात गावपळण ही प्रथा आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते. प्राचीन काळापासून चालत आलेली ही प्रथा आहे. या काळात गावातील प्रत्येकजण आपला संसार सोबत घेऊन पाच दिवस गावाच्या वेशीबाहेर वास्तव्याला जातो.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 450 वर्षांपासून गावात ही प्रथा पाळली जाते. या गावपळणीला शुक्रवारपासून सरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ आपला संसार घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत असलेल्या दडोबा डोंगराच्या पायथ्याला वास्तव्याला जातात. तिथेच तंबू ठोकून पाच दिवस राहातात. या काळात हे ग्रामस्थ आपले पाळीव प्राणी देखील गावात ठेवत नाहीत. पाच दिवस संपूर्ण गाव वस पडतं.
advertisement
त्यानंतर गावभरणीच्या वेळी देवाला कौल लावला जातो. जोपर्यंत देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेरच राहतात. त्यामुळे तीन, पाच किंवा सात दिवसांची ही गावपळण असते. तळकोकणातील तीन गावात ही प्रथा पाळली जाते. शिराळे, आचरा, चिंदर या गावात ही प्रथा पाळली जाते. मात्र शिराळे हे असं एकमेव गाव आहे, की या गावात दरवर्षी ही प्रथा पाळली जाते.
advertisement
प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि गावात 5 दिवस कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे ,सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागतात. शाळा सुद्धा गावात 5 दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.
advertisement
या गावपळणीसाठी चाकरमानी, लेकीबाळीही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावाच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जातं असं येथील ग्रामस्थ सांगतात.
view commentsLocation :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 21, 2024 12:04 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
महाराष्ट्रातील हे गावं अख्ख 5 दिवसांच्या सुट्टीवर; गावात स्मशान शांतता, काय आहे 450 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही प्रथा?


