दातांच्या पिवळेपणावर रामबाण उपाय! करा 'हे' घरगुती उपाय; दात होतील मोत्यांसारखे शुभ्र
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
दातांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती केवळ सौंदर्य नव्हे तर आरोग्याचंही प्रतीक आहे. डॉ. आर.सी. द्विवेदी सांगतात की दात पिवळे, किडलेले असतील किंवा...
आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि यामध्ये तोंडाचे आरोग्य देखील महत्त्वाची भूमिका बजावते. स्वच्छ आणि निरोगी दात केवळ आपले स्मित आकर्षक बनवत नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीही आवश्यक आहेत. दातांची कीड, हिरड्यांचे संक्रमण आणि तोंडाचा कर्करोग यांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असते.
घरातील वस्तुंची ही पेस्ट पिवळेपणा करते दूर
आयुर्वेदिक डॉक्टर आर. सी. द्विवेदी सांगतात की, जर तुम्हाला तुमचे पिवळे दात पांढरेशुभ्र करायचे असतील आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून व दातांच्या किडीपासून सुटका हवी असेल, तर आयुर्वेदानुसार हे उपाय केल्यास तुमचे दात अगदी स्वच्छ आणि मजबूत होतील. जर तुमचे दात पिवळे झाले असतील, तर तुम्ही घरी बसूनच दातांचा पिवळेपणा दूर करू शकता. पूर्वीच्या काळी, आजी-आजोबा हळद पावडरमध्ये थोडे मोहरीचे तेल आणि मीठ मिसळून पेस्ट तयार करण्याचा सल्ला देत. ही पेस्ट दातांवर लावा. काही दिवसांतच तुम्हाला दिसेल की तुमच्या दातांचा पिवळेपणा निघून गेला आहे.
advertisement
शेणीच्या गोवऱ्या अन् लिंबूचा हा पर्याय उत्तम
हा दुसरा उपाय गावांमध्ये आजही पाहायला मिळतो. खरं तर, गायीच्या शेणाच्या गोवरीच्या राखेने दात घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. मात्र, या राखेत मीठ आणि तुरटी मिसळण्याची खात्री करा. त्यानंतरच ती दातांवर लावा. यामुळे तुमचे पिवळे दात उजळतात. जर तुम्हाला हे शक्य नसेल, तर आम्ही तुम्हाला आणखी एक सोपा उपाय सांगतो, जो घरात सहज उपलब्ध असतो. लिंबू प्रत्येक घरात सहज मिळतो. लिंबाची साल फेकून न देता ती वाळवून ठेवा. या सालीमध्ये मीठ मिसळून दातांवर घासा. यामुळे तोंडाच्या दुर्गंधीसोबतच पिवळे दातही स्वच्छ होतील.
advertisement
आबांच्या पानांचा योग्य उपचार
पिवळ्या दातांसाठी आणखी एक घरगुती उपाय जाणून घेऊया. जर तुमच्या जवळपास आंब्याचे झाड असेल, तर गरजेनुसार 2 ते 3 पाने तोडा. ही पाने चावा. जेव्हा पानांचा लगदा तयार होईल, तेव्हा त्या लगद्याने तुमचे दात स्वच्छ करा. तुमचे पिवळे आणि घाणेरडे दातही स्वच्छ होतील. आयुर्वेदिक डॉक्टर आर. सी. द्विवेदी सांगतात की, हे उपाय आजही ग्रामीण भागात वापरले जातात. आजही गावातील लोक टूथपेस्ट वापरत नाहीत. गावात जे काही उपलब्ध असेल, त्याने ते दात स्वच्छ करायचे. याशिवाय, आजही गावात बारा महिने झाडांपासून बनवलेल्या दातवण (काड्या) उपलब्ध असतात. तुम्ही या दातवणचाही वापर करू शकता.
advertisement
हे ही वाचा : Monsoon Tips: पावसाळ्यात कोणती फळं खावी? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळं चांगली? Video
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दातांच्या पिवळेपणावर रामबाण उपाय! करा 'हे' घरगुती उपाय; दात होतील मोत्यांसारखे शुभ्र