Winter Care : थायलंड बामचीही होईल सुट्टी, ही भारतीय पुरचुंडी करेल सर्दी खोकल्यापासून रक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपचार देखील खूप प्रभावी ठरू शकतात. यातच एक जादुई पुरचुंडी उपयुक्त ठरते. खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. ही जादूची पोटली बनवण्यासाठी एक सूती कापड, कापूर, ओवा, लवंग हे साहित्य आवश्यक आहे.
मुंबई : प्रत्येक व्यक्तीला ऋतूनुसार प्रकृतीत बदल जाणवतात. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा अशा प्रत्येक ऋतूचं हवामान प्रत्येकाला अनुकूल असेलच असं नाही.
हिवाळ्यातलं थंड वातावरण जितकं आल्हाददायक वाटतं तितकंच ते काहींसाठी त्रासदायक ठरु शकतं. आजकाल बहुतेकांना हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास जाणवतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कमकुवत प्रतिकारशक्ती. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते तेव्हा अनेक आजार शरीरात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपचार देखील खूप प्रभावी ठरू शकतात. यातच एक जादुई पुरचुंडी उपयुक्त ठरते. खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. ही जादूची पोटली बनवण्यासाठी एक सूती कापड, कापूर, ओवा, लवंग हे साहित्य आवश्यक आहे.
खोकला आणि सर्दी सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी, ही पुरचुंडी बनवणं अगदी सोपं आहे. सुती कापडाचा एक छोटा तुकडा कापून घ्या. आता या कापडावर कापूर तोडून टाका, अर्धा चमचा ओवा आणि दोन-चार लवंगा ठेवा आणि गाठ बांधा. घट्ट बांधण्यासाठी दोराही वापरू शकता. जेणेकरून यातल्या वस्तू बाहेर पडणार नाहीत. या पुरचुंडीचा वास घेत राहा. सर्दीमुळे अनेकदा नाक बंद होतं, कधीकधी श्वास घेण्यास त्रास होतो, अशावेळी थायलंड बाम वापरला जातो. ही पुरचुंडी थायलंड बाम इतकीच फायदेशीर आहे.
advertisement
आता पाहूयात, यातल्या सामग्रीची उपयुक्तता. कापरातल्या शक्तिशाली गुणधर्मांमुळे कापूर हुंगल्यानं नाकातील मार्ग स्वच्छ होण्यास मदत होते.
लवंगांमधे अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. बंद नाक, घसा खवखवणं आणि खोकला साफ करण्यास मदत करतात.
याशिवाय, ओव्यामधे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, यामुळे सर्दी आणि खोकला तसंच व्हायरल इन्फेक्शनपासून आराम मिळतो. प्रकृती चांगली राहते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 10:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : थायलंड बामचीही होईल सुट्टी, ही भारतीय पुरचुंडी करेल सर्दी खोकल्यापासून रक्षण