Peanut Difference: शेंगदाणे आवडीने खाता ना, मग शेंगदाण्यातले ‘हे’ फरक आणि फायदे माहिती आहेत का?

Last Updated:

Difference and benefits of red and White peanuts in Marathi: शेंगदाण्यात अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असतात. त्यांना गरीबांचं बदाम असंही संबोधलं जातं. शेंगदाणे हे सर्वसाधारणपणे लाल आणि पांढऱ्या सालीचे असतात.

प्रतिकात्मक फोटो : 
 शेंगदाणे आवडीने खाता ना, ‘हे’ फरक माहिती आहेत का ?
प्रतिकात्मक फोटो : शेंगदाणे आवडीने खाता ना, ‘हे’ फरक माहिती आहेत का ?
मुंबई: भूक लागल्यावर आपण जेवतो. मात्र भूक नसतानाही जे आवडीने खातो ते म्हणजे शेंगदाणे. समुद्रकिनारी बसल्यावर काहीतरी टाईमपास किंवा दारू पिताना चखणा म्हणून हे शेंगदाणे अनेक जण आवडीने खातात. शेंगदाण्यात अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असतात. त्यांना गरीबांचं बदाम असंही संबोधलं जातं. शेंगदाणे हे सर्वसाधारणपणे गुलाबी किंवा फिक्कट लाल रंगाचे असतात. मात्र तुम्हाला जर सांगितलं की शेंगदाणे हे पांढऱ्या रंगाचे असतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुढे तुम्हाला असंही सांगितलं की, तुम्ही पांढरे शेंगदाणे हे खाल्ले आहेत तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. सध्या बाजारात पांढऱ्या सालीचे आणि लाल सालीचे शेंगदाणे उपलब्ध आहेत.

जाणून घेऊयात दोन्ही शेंगदाण्यांमध्ये नेमका फरक काय आहे तो ?

Peanut Difference: शेंगदाणे आवडीने खाता ना, मग शेंगदाण्यातले ‘हे’ फरक माहिती आहेत का?
लाल शेंगदाण्यांची चव ही  नैसर्गिकरित्या गोड असते आणि ते थोडे नरम असतात. तर पांढरे शेंगदाणे हे कुरकुरीत आणि चवीला थोडे खारट असतात. म्हणूनच त्यांना खारे शेंगदाणे असं सुद्धा म्हणतात. लाल शेंगदाण्यांच्या वापर हा चिवडा, सूप किंवा पावडर करून दुधात टाकून पिण्यासाठी होतो. पांढऱ्या शेंगदाण्यांचा वापर हा तेल किंवा बटर बनवण्यासाठी केला जातो. पांढऱ्या शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी ते खाणं फायद्याचं ठरू शकतं. लाल शेंगदाण्यांमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. याशिवाय रक्तवाढीसाठी सुद्धा ते फायद्याचे ठरतात. लाल शेंगदाण्यांमुळे पचनही सुधारायला मदत होते. पांढऱ्या शेंगदाण्यात कॅल्शियम जास्त असल्याने वृद्ध आणि लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी ते फायद्याचे ठरतात.
advertisement

चांगल्या दर्जाचे शेंगदाणे निवडताना घ्या ‘ही’ काळजी

शेंगदाणे निवडताना त्यांचा दर्जा तपासण्यासाठी ही एक फारच सोपी आणि साधी पद्धत आहे. शेंगदाण्याच्या टोकाकडे पाहा. जर ते टोकदार असतील तर ते शेंगदाणे चांगल्या दर्जाचे आहेत असं समजा. जर या शेंगदाण्यांचं टोक तुटलं असेल त्यांना टोक नसेल तर शेंगदाण्याच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
advertisement

रंग:

लाल किंवा पांढऱ्या शेंगदाण्यांसाठी निवडताना जे ताजे आणि ज्यांचा चमकदार आहे असेच शेंगदाणे निवडा. ज्या शेंगदाण्यांवर डाग पडलेत किंवा ते नरम पडलेत असे शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

वास:

शेंगदाणे विकत घेण्यापूर्वी मूठभर शेंगदाणे हातात घेऊन त्यांचा वास घ्या. जर त्यांना थोडा मातीचा सुगंध आला तर ते चांगल्या दर्जाचे शेंगदाणे असतील. मात्र जर त्यांना कुबट वास आला तर असे शेंगदाणे खरेदी करणं टाळा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Peanut Difference: शेंगदाणे आवडीने खाता ना, मग शेंगदाण्यातले ‘हे’ फरक आणि फायदे माहिती आहेत का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement