दिवाळीत घर सजावटीसाठी लायटिंगची बजेट फ्रेंडली शॉपिंग करायचीय? क्रॉफर्ड मार्केट बेस्ट पर्याय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
दिवाळीमध्ये घर सजावटीसाठी लाइटिंगची सगळ्यात जास्त क्रेझ असते आणि दरवर्षी आपल्या घराच्या सजावटीसाठी नवनवीन लायटिंग असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मुंबईत लायटिंग तोरण तुम्हाला स्वस्त दरात क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतील.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण पूर्ण तेजोमय प्रकाशात भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्वत्र दिव्यांच्या लायटिंगचा झगमगाट, फटाके, फराळ , नवनवीन कपडे ही दिवाळीची खासियत आहे. दिवाळीमध्ये घर सजावटीसाठी लाइटिंगची सगळ्यात जास्त क्रेझ असते आणि दरवर्षी आपल्या घराच्या सजावटीसाठी नवनवीन लायटिंग असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मुंबईत लायटिंगचे तोरण तुम्हाला स्वस्त दरात क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतील.
advertisement
काय आहे किंमत?
आपल्या घराजवळ दिवाळीत आकर्षित डिझाईनच्या लाईट लावून आपले घर आणि घराजवळ बाहेरील परिसर सजवावा असे सर्वांना वाटते. त्यामुळे तुम्ही मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे असणाऱ्या अब्दुल रहमान स्ट्रीट येते असणाऱ्या फॅन्सी वर्ड या दुकानाला नक्की भेट देवू शकता. या दुकानामध्ये 5 मीटर लायटिंग 60 रुपयांमध्ये होलसेल दरात मिळतात आणि 90 रुपयात 14 मीटर लायटिंगचे तोरण मिळतात.
advertisement
90 रुपयात 25 मीटर सिंगल लायटिंगच तोरण या दुकानात मिळते तर विविध रंगाचा लाईट इथे 700 रुपयाला मिळतात. रंगबिरंगी रंगाचा ब्लप 120 रुपयाला मिळते आणि जर तुम्हाला 100 मीटर तोरण पाहिजे असेल तर फक्त 1300 रुपयाला होलसेल दरात इथे मिळतात.
advertisement
फुलाची डिझाईन असणारी लायटिंग
त्याचप्रमाणे आपल्या घराजवळच्या आजूबाजूला असणारे झाड लायटिंगने जर तुम्हाला डिझाईन करायचे असतील येथे 600 रुपये पासून येथे सुरुवात होते. यामध्ये तुम्हाला अडीचशे मीटर लाईट भेटेल. यामध्ये फुलाची डिझाईन असणारी लायटिंग सुद्धा आहेत. जर तुम्हाला या दिवाळीमध्ये आपल्या घरात आकर्षक डिझाईन लायटिंग पाहिजे असतील तर मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये असणाऱ्या दुकानाला नक्की भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2024 3:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळीत घर सजावटीसाठी लायटिंगची बजेट फ्रेंडली शॉपिंग करायचीय? क्रॉफर्ड मार्केट बेस्ट पर्याय