Kiwi fruit benefits: ‘या’ फळाचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित सेवनाने दूर पळतील अनेक आजार

Last Updated:

Health benefits of Kiwi Fruit in Marathi : किवीत मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय किवी खाल्ल्यामुळे किवी खाल्ल्याने शरीराच्या पेशींची झालेली झीज भरून येते.

News18
News18
मुंबई : किवी हे फळ बाहेरून दिसायला चिकूप्रमाणे जरी असलं तरीही ते मूळचं  चीनमधलं आहे. मात्र आता संपूर्ण जगात हे फळ सहज उपलब्ध होतं. किवीत मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स फायबर, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स अशी विविध पोषक तत्वं भरपूर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय किवीच्या फळात  दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे संधीवात किंवा अंगदुखीच्या समस्यांवर किवी फळ खाल्ल्याने आराम मिळू शकतो. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय किवी खाल्ल्याने शरीराच्या पेशींची झालेली झीज भरून येते. त्यामुळे कमकुवत पेशींना  ताकद मिळून त्या मजबूत होतातच शिवाय नव्या पेशींचीही जोमाने वाढ होते. त्यामुळे एखादी जुनाट जखम लवकर भरत नसेल तर किवीच्या सेवनामुळे ती जखम लवकर भरायला मदत होईल. जाणून घेऊयात किवी फळाचे आरोग्यदायी फायदे.
Health benefits of Kiwi Fruit in Marathi: ‘या’ फळाचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित सेवनाने दूर पळतील अनेक आजार
1) दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर : एका अहवालानुसार, दम्याच्या रुग्णांसाठी किवी खाणं फायद्याचं ठरतं. किवीत असलेलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स दम्याची लक्षणे आणि त्रास कमी करायला मदत करतात.
advertisement
2) हृदयाचं आरोग्य सुधारतं : किवीचे सेवन केल्याने एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. याशिवाय वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सही कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची भीती कमी होते.
3) आतड्यांच्या आरोग्यासाठी वरदान : किवी हे फळ बहुगुणी जरी असलं तरीही ते आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. किवीमध्ये असलेल्या अ‍ॅक्टिनिडिन एंझाइम्स प्रोटिन्स तोडून अन्न लवकर पचायला मदत करतात. किवीत भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. याशिवाय गॅसेस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते:  किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फोलेट तसेच कॅरोटीनॉइड्स, फायबर आणि पॉलिसेकेराइड्स असतात. हे सगळे घटक आपल्या शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण करतात. त्यामुळे शरीराला असलेल्या संभाव्य संक्रमणांचा धोका टळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
Health benefits of Kiwi Fruit in Marathi: ‘या’ फळाचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित सेवनाने दूर पळतील अनेक आजार
5) जुनाट आजारांचा धोका कमी होतो : किवीमध्ये अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स पेशींमधून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. मधुमेह, यकृत रोग, हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी अनेक जुनाट आजारांसाठी ऑक्सिडेटिव्ह ताण जबाबदार आहे. अशा परिस्थितीत, किवीचे सेवन केल्याने या आजारांचा गंभीर आजारांचा धोका टाळता येतो.
advertisement
6) डोळ्यांसाठी फायदेशीर : किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येतं. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. किवीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मुबलक प्रमाणात मिळते. ज्यामुळे रेटीनाचं आरोग्य सुधारून दृष्टीदोष कमी व्हायला मदत होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kiwi fruit benefits: ‘या’ फळाचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित सेवनाने दूर पळतील अनेक आजार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement