Eggs Vs Paneer: आरोग्यासाठी फायद्याचं काय अंड की पनीर? कशातून मिळतील जास्त प्रोटिन्स् ?

Last Updated:

Eggs vs Paneer benefits in Marathi: पनीर आणि अंडी दोन्हीही स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाऊ शकतात. मात्र दोघांच्या पोषकतत्वांमध्ये थोडासा फरक आहे. जाणून घेऊयात आरोग्यासाठी काय जास्त फायद्याचं अंड की पनीर ?

News18
News18
मुंबई : आपल्या आरोग्यासाठी आणि तंदुरूस्त शरीरासाठी विविध पोषकतत्त्वं, जीवनसत्व आणि खनिजांची आवश्यकता असते. प्रोटिन्स आणि कॅल्शियम त्यापैकीच एक. अंडी आणि पनीर हे दोन्हीही प्रोटिन्स आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. मात्र अनेकदा यावरून वाद होतात. ज्या व्यक्ती अंडी खातात ते अंड्याचं कौतुक करतात आणि ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत त्या पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचं कौतुक करतात. मात्र पनीर आणि अंडी दोन्हीही स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाऊ शकतात. मात्र दोघांच्या पोषकतत्वांमध्ये थोडासा फरक आहे. जाणून घेऊयात आरोग्यासाठी काय जास्त फायद्याचं अंड की पनीर ?
Eggs vs Paneer benefits in Marathi: आरोग्यासाठी फायद्याचं काय अंडी की पनीर? कशातून मिळतील जास्त प्रोटिन्स् ?
अंड की पनीर जास्त फायद्याचं काय ?
रंजना न्यूट्रिग्लो क्लिनिकच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांनी न्यूज18 ला सांगितलं की, अंडी आणि पनीर दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. कोणी अंडी खावीत आणि कोणी पनीर खावं हे फक्त शाकाहार, मांसाहार यावर नाही तर ते खाण्यामागे त्यांच्या उद्देश काय आहे यावर अवलंबून आहे. उदा. एखादी व्यक्ती मांसाहारी असेल मात्र त्यांची गरज आणि फिटनेसचं उदीष्ठ य हे जर वेगळं असेल तर त्यांच्यासाठी अंड्यापेक्षा पनीर जास्त फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
पोषकतत्वांमधला फरक
एका अंड्यामध्ये सुमारे 6 ते  7 ग्रॅम प्रथिनं असतात. तर 100 ग्रॅम चीजमध्ये सुमारे 18 ते 21 ग्रॅम प्रथिने असतात. याचा अर्थ पनीरमध्ये जास्त प्रथिनं असतात, परंतु अंड्यातलं प्रथिनं ही जैविक असल्यामुळे ती शरीरात सहजपणे शोषली जाऊ शकतात. जर फॅट्स बोलायचं झालं तर एका अंड्यामध्ये 5 ग्रॅम चरबी असते, तर चीजमध्ये 20 ते 25 ग्रॅम चरबी असते. एका अंड्यामध्ये सुमारे 70 कॅलरीज असतात, तर 100 ग्रॅम चीजमध्ये 250 ते 300 कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असलेला आहार घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी अंडी हा एक चांगला पर्याय ठरतो. याउलट जर तुम्हाला स्नायू बळकट करून वजन वाढवायचं असेल तर आणि तुम्ही मांसाहारी जरी असाल तरीही तुमच्यासाठी पनीर खाणं फायद्याचं ठरतं.
advertisement
अंडी आणि पनीर दोन्ही आरोग्यदायी ?
अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, कोलीन, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तर पनीरमध्ये त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या  आणि दातांच्या आरोग्यासाठी पनीर खाणं फायद्याचं ठरतं. तर, मेंदू आणि डोळ्यांसाठी अंडी जास्त फायदेशीर असतात. एकंदरीत असे म्हणता येईल की अंडी आणि पनीर दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ निवडून स्वत:ला फिट ठेऊ शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eggs Vs Paneer: आरोग्यासाठी फायद्याचं काय अंड की पनीर? कशातून मिळतील जास्त प्रोटिन्स् ?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement