Fatty Liver in Kids: तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार

Last Updated:

Fatty liver problem in young kids: फॅटी लिव्हरचा त्रास हा फक्त मद्यपान करणाऱ्यांनाच होतो असं नाहीये. तर ज्या व्यक्तींच्या, मग ती लहान मुलं असोत की तरूण किंवा मध्यमवयीन यकृतावर चरबी जमा झालीये. त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. त्यामुळे तुमचं मुल किंवा मुलगी ही गुटगुटीत किंवा स्थूल असेल तर आधी त्यांची BMI तपासणी करू घ्या. जर BMI जास्त आला तर समजून जा की, त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे.

प्रतिकात्मक फोटो : तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
प्रतिकात्मक फोटो : तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
मुंबई : सुदृढ, गुटगुटीत गोंडस बाळ कोणाला नाही आवडत ? अशी लहान मुलं दिसली की, अनेकांना त्यांचा गालगुच्चा घ्यावासा वाटतो. मात्र मुलांचं गुटगुटीत असणं हे त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. आपल्यातल्या अनेक तरूणांना चाळीशीनंतर स्थूलपणा किंवा ओबेसिटीचा त्रास सुरू होतो. ज्यामुळे त्यांचं पोट सुटालला लागतं. वजन सतत वाढत राहतं किंवा ते नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे वाढतं वजन किंवा स्थूलपणा अनेकांसाठी डोकेदुखी ठरू लागलाय.

स्थूलपणा म्हणजे काय ?

एखादी व्यक्ती अंगकाठीने सुदृढ असणं, ती धिप्पाड असणं आणि ती जाड किंवा स्थूल असणं यात फरक आहे. एखादी व्यक्ती धिप्पाड जरी असली तरीही ती स्थूल नसते. कारण व्यक्तीच्या शरीरात फॅट्सचं प्रमाण कमी असतं. मात्र त्या व्यक्तींच्या हाडांच्या वजनामुळे त्यांचं वजन जास्त असतं. म्हणून वजन जास्त असलं तरीही त्यांचं पोट सुटलेलं दिसत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स जास्त ती व्यक्ती स्थूल किंवा जाड मानली जाते.
advertisement
Fatty Liver in Kids: तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
आता तुम्ही म्हणाल की BMIचा नियम तर तरूण किंवा मध्यमवयीन व्यक्तींना लागू होतो याचा लहान मुलांशी काय संबंध? तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. BMI हा प्रत्येकाला लागू होतो. त्यामुळे तुमचं मुलं सुदृढ असेल तर काही हरकत नाही.मात्र ते गुटगुटीत असेल तर इथे धोका निर्माण होऊ शकतो. कारण गुटगुटीतपणाचं रूपांतर स्थूलतेत होऊन त्यांना भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा तर लागेलच. मात्र त्यांना याच वयात फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
advertisement

काय आहे फॅटी लिव्हर ?

Fatty Liver in Kids: तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
यकृत किंवा लिव्हरवर त्याच्या वजनाच्या 5 ते 10 टक्के चरबी जमा झालेल्या रोगाला फॅटी लिव्हर असं म्हणतात. फॅटी लिव्हर चे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असे 3 टप्पे मानले जातात. त्यापुढच्या फॅटी लिव्हरचं रूपांतर हे लिव्हर सिरॉसीसमध्ये होऊन यकृत निकामी होण्यात होतं. ग्रेड 1 मध्ये यकृतावर 5 ते 34 टक्के चरबी जमा होते. ग्रेड 2 मध्ये यकृतावर 34ते 66 टक्के चरबी जमा होते.ज्या यकृतावर 66 टक्क्यांपेक्षा अधिक चरबी असते त्या लिव्हरची गणना ग्रेड 3 मध्ये होतो.
advertisement

फॅटी लिव्हरचे प्रकार ?

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅट लिव्हर असे फॅटी लिव्हरचे 2 प्रकार पडतात.

लहान मुलांना धोका कसा ?

Fatty Liver in Kids: तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
आता तुमच्या लक्षात आलं असेलच की, फॅटी लिव्हरचा त्रास हा फक्त मद्यपान करणाऱ्यांनाच होतो असं नाहीये. तर ज्या व्यक्तींच्या, मग ती लहान मुलं असोत की तरूण किंवा मध्यमवयीन व्यक्ती, यकृतावर चरबी जमा झालीये. त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. त्यामुळे तुमचं मुल किंवा मुलगी ही गुटगुटीत किंवा स्थूल असेल तर आधी त्यांची BMI तपासणी करू घ्या. जर BMI जास्त आला तर समजून जा की, त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे.
advertisement
पूर्वी असं मानलं जायचं की 3 व्यक्तींपैकी एका व्यक्तींला फॅटी लिव्हरचा त्रास आहे. दुर्देवानं आता हेच प्रमाण लहान मुलांनाही लागू पडतंय. 3 पैकी एक गुटगुटीत मुलगा / मुलगी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या आजाराला बळी पडते आहे.
एका अहवालानुसार, 8 ते 20 वयोगटातील 17 ते 40 टक्के मुलांचा BMI म्हणजेच त्याचं वजन हे जास्त आढळून आलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांची बदललेली आणि वाईट जीवनशैली. मुलं अनेकदा जंक फूड खातात. त्यात मोबाईल कंम्प्युटर आणि टिव्हीमुळे त्यांचे मैदानी खेळ बंद झालेत. या सगळ्याचा प्रकार त्यांच्या पॅक्रियाजवर होऊन इन्सुलिन स्रवण्याचं प्रमाण कमी होतं,ज्यामुळे यकृतावर चरबी जमा होऊ लागते.
advertisement

उपाय काय ?

फॅटी लिव्हरमुळे यकृतामध्ये जळजळ होते. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृताला जखमा होऊ शकतात. ज्याची परिणीती पुढे लिव्हर सिरोसिसमध्ये होऊ शकते. ज्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हृदयावर होतो. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे तुमच्या मुलाला भविष्यातल्या अशा आजारांपासून वाचवायचं असेल तर त्यांना मैदानी खेळ आणि व्यायामाचं महत्त्व पटवून द्या. याशिवाय त्यांच्या आहारातलं जंक फूडचं प्रमाण कमी करून त्यांना पौष्टिक आहार दिल्यास  ते निरोगी राहू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatty Liver in Kids: तुमचं मुल गुटगुटीत आहे? आत्ताच व्हा सावध, त्यांना असू शकतो ‘हा’ आजार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement