एकदा केली 4 दिवस टिकते, छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध नान रोटी बनते तरी कशी? पाहा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मोहम्मद-बिन-तुघलक यांच्या काळात त्यांच्या सैन्यासाठी एक खास नान रोटी ही तयार केली जात होती. या नान रोटीला आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून आहे. शहरामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत हे बघून अनेक पर्यटक हे भारावून जातात. शहरातली अजून एक खासियत म्हणजे मोहम्मद-बिन-तुघलक यांच्या काळात त्यांच्या सैन्यासाठी एक खास नान रोटी ही तयार केली जात होती. या नान रोटीला आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर ही नान रोटी कशी तयार होते याबद्दच माहिती विक्रते सय्यद नईमन यांनी दिली आहे.
advertisement
मोहम्मद-बिन-तुघलक यांच्या काळापासून ही नान रोटी बनवली जात आहे. ही नान रोटी चार-पाच दिवस टिकते. विशेष करून नॉनव्हेज सोबत ही नान रोटी खाल्ली जाते. नान रोटी तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही इतर कोणत्याही भाजी सोबत ही नान रोटी खाऊ शकतात. ही नान रोटी प्रामुख्याने मैदा आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाते.
advertisement
सर्वप्रथम मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये मीठ, ईस्ट, सोडा आणि पाणी टाकून याचा छान गोळा मळून घेतला जातो. त्यानंतर हा गोळा थोडा वेळ बाजूला ठेवून त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून छोटी पोळी लाटून घ्यायची. छोटी पोळी लाटून घेतलेली आहे. त्या रोटीला हाताने मोठ करून घ्यायचे. नंतर त्याला पाणी लावून त्यावरती हळदीचा कलर लावायचा आणि नंतर ती रोटी तंदूरमध्ये शिजवण्यासाठी ठेवायची.
advertisement
शिजवून झाली की तिला काढून त्याच्यावरती तूप किंवा बटर लावून ही नान रोटी तयार होते. तसेच ही नान रोटी तुम्ही गॅस वरती करू शकत नाही. त्याला विशेष एक तंदूर लागतं त्यातच तुम्ही नान रोटी तयार करू शकता. नान रोटीची किंमत ही 6 रुपये ते 12 रुपयांपर्यंत आहे. तसेच या रोटीला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. तसेच ही नान रोटी तुम्ही बरेच दिवस थंड करून स्टोअर करून ठेवू शकता. अशा पद्धतीने ही नान रोटी तयार केली जाते.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
February 25, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
एकदा केली 4 दिवस टिकते, छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध नान रोटी बनते तरी कशी? पाहा Video