प्रेग्नन्सीत घरीच बनवली खास डिश, आता बनली कमाईचं साधन, मुंबईत होतेय गर्दी

Last Updated:

Mumbai Food: भारतातील पहिला चॉकलेट बाऊल केक मुंबईत मिळतोय. प्रेग्नन्सीत चॉकलेट, आईस्क्रीम आणि केक बेसच्या माध्यमातून बनवलेली खास डिश आता कमाईचं साधन बनलीये.

+
आईस्क्रीम,

आईस्क्रीम, चॉकलेट अन् केक, प्रेग्नन्सीत बनवली खास डिश, आता मुंबईत भारी डिमांड!

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईच्या खाद्य संस्कृतीत नवनव्या पदार्थांची सातत्याने भर पडत असते. जगभरातील विविध पदार्थ मुंबईत मिळत असतात. असाच एक खास पदार्थ कांदिवली येथील ‘ऑल डीप इंडिया’ यांच्याकडे मिळतोय. भारतातील पहिलं चॉकलेट बाऊल केक या ठिकाणी मिळतेय. खुशबू शेख यांच्या प्रेग्नेंसी क्रेविंग्समधून आलेलं हे बाऊल केक मुंबईकरांना खूप आवडत आहेत. तुम्हाला देखील हे चविष्ट बाऊल केक खाण्याची इच्छा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन ठरेल.
advertisement
‘ऑल डीप इंडिया’मध्ये स्विस चॉकलेट बाऊल केक, रेड वेलवेट बाऊल केक, बिसऑफ बाऊल केक, ब्ल्यूबेरी बाऊल केक असे सगळे बाऊल केक फक्त 199 रुपयांपासून मिळतात. बाऊल केक सोबतच इथे वेगवेगळ्या प्रकारची क्रूसंट, हॉट चॉकलेट, कोल्ड चॉकलेट सुद्धा मिळतात. सध्या स्ट्रॉबेरीचा सिझन सुरू असल्यामुळे इथे तुम्हाला स्ट्रॉबेरी चॉकलेट बाऊल फक्त 199 रुपयांना मिळेल. यामध्ये खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आणि वरून मस्त क्रिमी चॉकलेट मिळेल.
advertisement
प्रेग्नन्सीत बनवली डिश
“प्रेग्नेंट असताना चॉकलेट, आईस्क्रीम आणि केक बेस एकत्र करून खाण्याची मला खूप इच्छा झाली होती. बाहेरचं खायला बंदी होती आणि अशा प्रकारचं काही मिळत नव्हतं. म्हणून मीच घरी केक बेस, आईस्क्रीम आणि चॉकलेट यांना एकत्र करून ही डिश बनवली. ही डिश ती मला खूप आवडली म्हणूनच मी ती इंट्रोड्युस करण्याचा निर्णय घेतला,” असं खुशबू शेख यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान,  तुम्हाला सुद्धा भारतातील सगळ्यात पहिला चॉकलेट बाऊल केक खाण्याची इच्छा असेल, तर कांदिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या महावीर नगर येथील या ऑल डीप इंडियाच्या शॉप मध्ये भेट द्या. इथं तुम्हाला खूप सारी क्रीम, ओरिजनल चॉकलेट, सॉफ्ट बेस अशा सगळ्याचा समावेश असलेला बाऊल केक मिळेल.
मराठी बातम्या/Food/
प्रेग्नन्सीत घरीच बनवली खास डिश, आता बनली कमाईचं साधन, मुंबईत होतेय गर्दी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement