फक्त फेब्रुवारीतच मिळते खास डिश, पुण्यात खायचीये? तर लगेच द्या इथं भेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Traditional food: महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक पदार्थ अनेकांना माहिती देखील नसतील. पुण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये फेब्रुवारी महिन्यात खास डिश मिळतेय.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुण्याची खाद्य संस्कृती जगात प्रसिद्ध असून वैविध्यपूर्ण आहे. इथे आपल्याला अनेक वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. असाच एक पदार्थ म्हणजे आंबिल-घुगऱ्या होय. पूर्वापार गावाकडे बनवल्या जाणाऱ्या आंबिल-घुगऱ्या आता पुण्यात देखील मिळत आहेत. कोथरूड भागात असणाऱ्या वंदिता रेस्टोरंट इथे फक्त फेब्रुवारी महिन्यातच हा पदार्थ मिळतो. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे अस्सल पारंपरिक पदार्थांवर ताव मारण्यासाठी पुणेकर इथं गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे दर महिन्याला वेगळी पारंपरिक डिश इथं मिळते. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पुण्यातील कोथरूड भागात असणारे वंदिता रेस्टॉरंट हे गेली एक वर्ष झालं सुरु आहे. इथं महाराष्ट्रीयन पदार्थ बनवले जातात. हे पुण्यातील एकमेव ठिकाण असून इथं वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ हे पुढच्या पिढीपर्यंत पोहचावे आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने वंदिता रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे. पूर्वी आपली आजी घरी हे पदार्थ बनवायची. पण आता हे पदार्थ घरात बनत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पदार्थ लोकापर्यंत जावेत हा रेस्टॉरंट सुरू करण्याचा उद्देश असल्याचं व्यावसायिक मिताली भुजबळ सांगतात.
advertisement
महाराष्ट्रात धर्मराज बीज म्हणून एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने आंबिल घुगऱ्या या बनवल्या जातात. वंदिता रेस्टॉरंटमध्ये फक्त फेब्रुवारी महिन्यात हा पारंपरिक पदार्थ बनवला जातो. ज्वारीचे पीठ, दही, ताक करून आंबील बनवले जाते. तसेच चपातीचा असणारा काला म्हणजेच मलिदा, घुगऱ्या, भरलं वांग हे पूर्ण एक थाळी बनवली जाते. यासोबतच मासवडी, शाक भाजी आणि लापशी, शेंगोळी, उडदाचे घुटे असे पारंपरीक पदार्थ हे बनवले जातात. ही थाळी 180 रुपये पासून सुरू होते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, अशी माहिती मिताली भुजबळ यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 07, 2025 5:58 PM IST