Green Peas Dhokla : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा सहज पचणारा मटार ढोकळा! पाहा टेस्टी आणि हेल्दी रेसिपी

Last Updated:

Green peas dhokla recipe in marathi : आज आम्ही तुम्हाला एक भन्नाटर रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे मटारचे ढोकळा. मटार ढोकळा हा एक हलका, पचायला सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता किंवा संध्याकाळचा पदार्थ आहे.

मटार ढोकळा रेसिपी
मटार ढोकळा रेसिपी
मुंबई : हिवाळा आला की बाजारात ताजे, गोड आणि हिरवे मटार सहज उपलब्ध होतात. या ऋतूत हिरव्या वाटाण्यांचा समावेश आहारात केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. हिरवे मटार फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले असतात. थंडीच्या दिवसांत पचन सुधारण्यासाठी, ऊर्जा टिकवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हिरवे मटार अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे हिवाळ्यात मटारपासून बनवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
हिरव्या मटारपासून उसळ, भाजी, पराठे, सूप असे अनेक पदार्थ बनवता येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक भन्नाटर रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे मटारचे ढोकळा. मटार ढोकळा हा एक हलका, पचायला सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता किंवा संध्याकाळचा पदार्थ आहे. रवा आणि मटार यांचे मिश्रण असल्यामुळे हा ढोकळा चवीसोबतच पोषणही देतो. चला तर मग पाहूया हिवाळ्यासाठी परफेक्ट असलेल्या मटार ढोकळ्याची सोपी रेसिपी.
advertisement
मटार ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
रवा
दही
पाणी
हिरवे मटार
हिरवी मिरची
आलं
मीठ
तेल
इनो
मटार ढोकळा बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या नंतर त्यामध्ये दही आणि पाणी मिसळा. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण सेट होण्यासाठी आणि राव व्यवस्थित फुलण्यासाठी थोडा वेळ झाकून बाजूला ठेवा.
advertisement
- दुसरीकडे एका मिक्सरच्या भांडयात मटार, मिरची आणि आलं टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या.
- आता तयार मटारची पेस्ट राव आणि दह्याच्या मिश्रणात घाला. नंतर त्यामध्ये चापुरते मीठ, इनो घाला. इनो सक्रिय करण्यासाठी त्यावर थोडे पाणी घाला आणि हलक्या हाताने हे सर्व एकत्र करून घ्या.
- आता तुमचे ढोकळ्याचे बॅटर तयार आहे. हे मिश्रण आता आपल्याला वाफवायचे आहे. त्यासाठी एका गॅसवर ढोकळ्याचे भांडे ठेवा आणि त्यात थोडे पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
advertisement
- आता ढोकळ्याचे बॅटर ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाका आणि बटरमधील हवेचे बुडबुडे म्हणजेच एअर बबल घालवण्यासाठी प्लेट हलक्या हाताने ओट्यावर आदळा.
- आता ही प्लेट ढोकळ्याच्या भांड्यात ठेऊन त्याला झाकण लावून घ्या आणि ढोकळा वाफवून घ्या. ढोकळा तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून पहा. चाकूला मिश्रण चिकटले नाही तर त्याचा अर्थ ढोकळा तयार आहे.
advertisement
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Green Peas Dhokla : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा सहज पचणारा मटार ढोकळा! पाहा टेस्टी आणि हेल्दी रेसिपी
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement