पावसाळ्यात केस गळतीची समस्या वाढलीय? फाॅलो करा 'हे' 6 घरगुती टिप्स; केस होती मजबूत अन् घनदाट
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे टाळू कमकुवत होतो आणि केस गळती वाढते. केस गळती कमी करण्यासाठी घरच्या 'या' उपायांचा अवलंब करा...
पावसाळा जितका आल्हाददायक वाटतो, तितकाच तो केसांच्या आरोग्यासाठी काही समस्याही घेऊन येतो. हवामान बदलल्यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे आपली टाळू (Scalp) कमजोर होते आणि केस गळायला लागतात. जर तुमच्यासोबतही असं होत असेल, की कंगवा फिरवताच केसांचा गुच्छ हातात येत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला 6 सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे केस मजबूत करू शकता आणि त्यांची गळती कमी करू शकता.
कांद्याचा रस केसांची वाढ करेल जाड
कांद्यामध्ये सल्फर असते, जे नवीन केस वाढण्यास मदत करते आणि केस गळणे थांबवते. यासाठी तुम्हाला फक्त एक कांदा घेऊन त्याचा रस काढायचा आहे. हा रस केसांच्या मुळांवर लावा आणि 20 मिनिटे तसाच ठेवा, नंतर कोणत्याही सौम्य शॅम्पूने धुवा. ही टीप आठवड्यातून दोनदा फॉलो करा आणि तुम्हाला लवकरच फरक दिसू लागेल.
advertisement
आले रक्ताभिसरण सुधारेल
आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचे तत्व असते, जे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण सुधारते. आल्याचा रस काढून तो टाळूवर 20-30 मिनिटे लावा, नंतर पाण्याने व्यवस्थित धुवा. आठवड्यातून एकदा असे केल्याने तुमचे केस मजबूत होतील.
तीन तेलांचे मिश्रण म्हणजे एक चमत्कारच
एका वाटीत एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा बदामाचे तेल आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्र करून थोडे गरम करा. या मिश्रणाने 15-20 मिनिटे डोक्याला व्यवस्थित मसाज करा. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढेल, ज्यामुळे केस मजबूत आणि जाड होतील.
advertisement
नारळाच्या दुधाने केसांना पोषण द्या
नारळाचे दूध केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. एका कप ताज्या नारळाच्या दुधाने केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत मसाज करा आणि 20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. या टीपमुळे तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील.
अंडे, मध आणि ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क
एका अंड्यात एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळून एक चांगली पेस्ट बनवा. हा मास्क मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि 20 मिनिटे ठेवा. नंतर साध्या पाण्याने धुवा. हा मास्क तुमचे केस मजबूत, जाड आणि रेशमी बनवेल.
advertisement
कोरफड जेलने केसांना थंडावा द्या
कोरफडमध्ये अँटीसेप्टिक घटक असतात, जे टाळूला थंडावा देतात तसेच केसांच्या वाढीस मदत करतात. ताजे कोरफड जेल काढून ते केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित मसाज करा. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. या टीपमुळे तुमचे केस मॉइश्चराइज राहतील आणि केस गळणे कमी होईल.
जास्त रसायने असलेल्या उत्पादनांपासून दूर राहा. आठवड्यातून किमान एकदा केसांना तेल लावा. केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा आणि खूप गरम पाणी टाळा. या टिप्समुळे तुमचे केस मजबूत होतील आणि केस गळणे कमी होईल. आजपासूनच या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा जेणेकरून या पावसाळ्यात तुमचे केस निरोगी, जाड आणि सुंदर राहतील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पावसाळ्यात केस गळतीची समस्या वाढलीय? फाॅलो करा 'हे' 6 घरगुती टिप्स; केस होती मजबूत अन् घनदाट