Mouth Ulcers : तोंडात अल्सर का होतात ? तात्पुरत्या उपचारांपेक्षा मूळ कारण शोधा, वाचा हेल्थ टिप्स

Last Updated:

तोंडात फोड येतात तेव्हा तात्पुरते उपचार केले जातात. पण त्यामागचं खरं कारण काय आहे याचा विचार करुन, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेणं आवश्यक आहे. 

News18
News18
मुंबई : काही कारणांमुळे तोंडात फोड आला तर दुखणं कधी बरं होईल असं वाटतं. तोंडात फोड येणं म्हणजे खाणं, पिणं, बोलणं कठीण होतं. कधीकधी या वेदना खूपच तीव्र असतात.
तोंडात फोड येतात तेव्हा तात्पुरते उपचार केले जातात. पण त्यामागचं खरं कारण काय आहे याचा विचार करुन, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेणं आवश्यक आहे.
हळद आणि मध - तोंडातील अल्सर हे व्हिटॅमिनच्या कमतरतेचंही लक्षण असू शकतं. हळद आणि मध वापरल्यानं तोंडातल्या अल्सरच्या वेदना कमी होण्यास मदत होते. हे करण्यासाठी, अर्धा ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळा. दिवसातून दोन-तीन वेळा या पाण्यानं गुळण्या करा. हळदीमुळे जीवाणू वाढीस प्रतिबंध होतो आणि मधातल्या गुणधर्मांमुळे अल्सर लवकर बरे करण्यास मदत होते.
advertisement
नारळाचं पाणी किंवा नारळाचं तेल -  नारळाच्या तेलात थंडावा असतो. दररोज नारळाचं पाणी प्यायल्यानं पोटातील उष्णता कमी होते आणि अल्सर लवकर बरे होतात. तोंडात दोन-तीन मिनिटं नारळाचं तेल फिरवल्यानं सूज आणि जळजळ दूर होते.
अनेक आजारांमुळे तोंडात अल्सर होऊ शकतात. नागीणसारखे विषाणूजन्य संसर्ग, आम्लपित्त, बद्धकोष्ठतेसारख्या पचन समस्या तसंच बी 12, लोह, जस्ताची कमतरता, हार्मोनल बदल, ताणतणाव, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि काही औषधांमुळेही अल्सर होऊ शकतात. यासाठी कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mouth Ulcers : तोंडात अल्सर का होतात ? तात्पुरत्या उपचारांपेक्षा मूळ कारण शोधा, वाचा हेल्थ टिप्स
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement