Health Tips: बदाम की अक्रोड, मेंदूच्या वाढीसाठी काय चांगलं? आहार तज्ज्ञांनी दिली माहिती

Last Updated:

 Health Tips: ड्रायफ्रूट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असं फायदेशीर असतं. यामधून आपल्याला पोषक घटक मिळत असतात.

+
मेंदूच्या

मेंदूच्या वाढीसाठी काय चांगल आहे बदाम की अक्रोड

छत्रपती संभाजीनगर : ड्रायफ्रूट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असं फायदेशीर असतं. यामधून आपल्याला पोषक घटक मिळत असतात. तसेच विशेष करून बदाम आणि अक्रोड खाणे हे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतं. आपण अक्रोड खायला पाहिजे की बदाम खायला पाहिजे म्हणजे दोघांपैकी काय जास्त फायदेशीर ठरतं? याविषयी आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिली आहे.
मेंदूच्या वाढीसाठी आपण बदाम आणि अक्रोड हे खात असतो पण हे दोन्ही खाणं देखील आपल्या शरीरासाठी विशेष करून मेंदूसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही बदाम खात असाल तर ते बदाम तुम्ही भिजवून खायला हवेतसोबत तुम्ही अक्रोड देखील भिजवून जर खाल्ले तर त्यातून जास्त फायदे हे मिळतात. तसेच ते खाण्याचे प्रमाण म्हणजेकी तुम्ही साधारण चार ते पाच बदाम आणि एक मूठभर अक्रोड दररोज खाल्ले तर ते फायदेशीर ठरतात.
advertisement
लहान मुलांना तुम्ही दररोज खायला देऊ शकता. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री असतो आणि ओमेगा थ्री देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप असे फायदे मिळतात. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. आणि ज्या पेशी असतातत्या डॅमेज होण्यापासूनही मदत करतं. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं आणि ते देखील खूप फायदेशीर असतं.
advertisement
तसंच बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं आणि ते मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतं. तसंच यामुळे मेंदूची नर्व्ह डॅमेज होण्यापासून मदत होते. तर अशा पद्धतीने याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही दररोज बदाम आणि अक्रोड खाणे गरजेचं आहे. विशेष करून तुमच्या मुलांना तुम्ही हे द्यायला हवं जेणेकरून त्यांच्या मेंदूची वाढ चांगल्या प्रमाणात होईल, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितले आहे
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: बदाम की अक्रोड, मेंदूच्या वाढीसाठी काय चांगलं? आहार तज्ज्ञांनी दिली माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement