Pomegranate Farming: डाळिंब फळबागेवर रोगाचा प्रादुर्भाव, 70 टक्के पिकाचे नुकसान, शेतकऱ्याचा खर्चही निघणे अवघड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या डाळिंब पिकावर तेल्या रोगाने मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. त्यामुळे संतोष उकर्डे या शेतकऱ्याच्या शेतातील 3 एकरावर असलेल्या आणि हाता-तोंडाशी आलेल्या 70 टक्के पिकाचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : करमाड येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या डाळिंब पिकावर तेल्या रोगाने मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. त्यामुळे संतोष उकर्डे या शेतकऱ्याच्या शेतातील 3 एकरावर असलेल्या आणि हाता-तोंडाशी आलेल्या 70 टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. तेल्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक फवारण्याही करण्यात आल्या आहेत, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे रोग आटोक्यात येत नसल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. यामुळे सरकारने कर्जमाफी करावी, अशी मागणी लोकल 18 सोबत बोलताना उकर्डे यांनी सरकारकडे केली आहे.
डाळिंब फळबागेसाठी दरवर्षी 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत खर्च जातो. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना तेल्या रोगाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठे आर्थिक संकट देखील शेतकऱ्यांवर आल्याने ते हतबल झाले आहेत. सरकारने कर्जमाफी करणार; पण कर्जमाफी कधी होणार, शेतकऱ्यांच्या मरणानंतर का? असा प्रश्न देखील फळबाग शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना वाटते की फळबाग शेतकरी सुखी असेल, मात्र रोगामुळे कुणीही सुखी नाही. अक्षरशः तेल्या रोगाने थैमान घातलेले आहे.
advertisement
डाळिंब शेतीला वातावरणाचा समतोल पाहिजे, तेव्हाच डाळिंब शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. पाणी नसेल तर पीक वाळते. कधी पाऊस आला तर तेल्या रोग येतो. तसेच पारंपरिक शेती करायची म्हटलं तर कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे फळबागायतदारांनी करायचे तरी काय, हे आम्हाला कळत नाही असे देखील उकर्डे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाचे पालन करून कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 02, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pomegranate Farming: डाळिंब फळबागेवर रोगाचा प्रादुर्भाव, 70 टक्के पिकाचे नुकसान, शेतकऱ्याचा खर्चही निघणे अवघड