फक्त 50 रुपयांत खात्रीशीर उपचार, महिलेनं सुरू केलं कांस्य थाळी मसाज सेंटर, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
इशिता पायाच्या दुखण्याने त्रस्त होत्या. तेव्हा त्यांना कांस्य थाळी मसाजचा खूप फायदा झाला.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, वात असो किंवा पायाला सूज येण अशा अनेक प्रकारच्या समस्या फक्त ज्येष्ठ नागरिक नाही तर तरुण पिढीमध्येही फार वाढताना दिसतात. पण सतत त्यावर ट्रिटमेंट घेणं, औषध खाणं सगळ्यांनाच परवडणारं असंत अस नाही. पण याच समस्यांवर उपाय म्हणून एका महिलेनं स्वस्तातलं कांस्य थाळी सेंटर सुरु केलं आहे. मुंबईतील इशिता शाह नावाच्या महिलेनं कांस्य थाळी सेंटर सुरु केलं आहे. विशेष म्हणजे इथे पायांच्या मसाजसाठी फक्त 50 रुपये आकारले जातात.
advertisement
50 रुपयांत कांस्य थाळी मसाज
इशिता या स्वत: पायाच्या दुखण्याने त्रस्त होत्या. तेव्हा त्या कांस्य थाळी मसाज हा उपचार स्वरुपात घेत होत्या. कांस्य थाळी मसाजनं त्यांना खूप चांगला फरक जाणवला. त्यांचा त्रास कमी झाला. मसाजचा स्वत:वर झालेला परिणाम पाहून त्यांनी लोकांनाही याबद्दल माहिती मिळावी आणि उपाचरपद्धती माहित व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. गोळ्या औषधांच प्रमाण थोडं कमी करून नैसर्गिक पद्धतीकडे लोकांनी वळावं यासाठी इशिता यांनी 'श्री' नावाचं कांस्य थाळी मसाज सेंटर सुरु केलं. जे घाटकोपर पश्चिम येथे पंतनगर मधील नायडू कॉलनी नावाच्या परिसरात आहे. तसेच या मसाजचा उपचार लोकांनाही परवडायला हवा यासाठी त्यांनी फक्त 50 रुपये अशी फार कमी किंमत यासाठी आकारली आहे.
advertisement
विविध मसाजचे दर
'श्री' कांस्य थाळी मसाज सेंटरमध्ये तेलाच्या मसाजसाठी 50 रुपये तर, तुपाच्या मसाजसाठी 60 रुपये आहेत. तसेच साप्ताहिक पासही उपलब्ध आहे . ज्यात मसाजच्या सात सिटींग असून त्यासाठी 300 रुपये आहेत. तर. मासिक पासमध्ये 30 सिटींग असून त्यासाठी 1200 रुपये आहेत. तसेच बॉडी मसाज खुर्चीसुद्धा या कांस्यथाळी सेंटरमध्ये आहे.
advertisement
दरम्यान, इशिता यांनी त्यांचा अनुभवही सांगितला आहे. त्या म्हणतात "कांस्य थाळीने माझं आयुष्यच बदललं. मी माझ्या पायाच्या दुखण्याने फार त्रस्त होते. पण कांस्य थाळी मसाजचे उपचार घेतल्यानं माझं दुखणं कमी झालं. तसेच माझ्या पतीलाही नाकसुरीचा त्रास होता. ज्यात नाकातून रक्तस्राव होतो. पण कांस्यथाळीच्या ट्रिटमेंटनंतर खूप फरक पडला". स्वत:ला आलेल्या अनुभवतातून लोकांनाही मदत मिळावी, त्यांची सेवा व्हावी यासाठी हे कांस्यथाळी सेंटर सुरु केल्याचं इशिता यांनी म्हटलं आहे.
advertisement
कशा पद्धतीनं केला जातो मसाज?
कांस्य थाळी केंद्रात तेल, तूप आयुर्वेदिक पद्धतीनं मसाज करतात. अगदी लहानांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच या केंद्रात मसाजसाठी येऊ शकतात. कांस्य थाळीवरच्या यंत्रावर तेल किंवा तूप लावून त्यावर आपण पाय ठेवल्यानंतर यंत्र सुरु केलं जातं. जेवढा टाइमर आपण लावतो त्यानुसार ते यंत्र फिरतं आणि आपल्या तळपायांना मसाज मिळतो.
advertisement
कांस्य थाळी मसाजचे फायदे
view commentsशरीरातील उष्णता कमी होते. वात कमी होतो. थकवा कमी होतो. डोकेदुखी कमी होते. झोप चांगली लागते. पायांच्या स्नायूंना आराम मिळतो. पायांच्या मुळाशी असलेल्या नसांना उत्तेजना होते. पायांमधील रक्तप्रवाह सुधारतो, असं इशिता सांगतात. तुम्हालाही पाय दुखणे, सुजणे, संधी वात तसेच डोकेदुखी, पोट साफ न होणे सारखे आजार असतील तर एकदा कांस्य थाळी मसाज ही उपचार पद्धत नक्कीच करून पाहू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2024 5:40 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
फक्त 50 रुपयांत खात्रीशीर उपचार, महिलेनं सुरू केलं कांस्य थाळी मसाज सेंटर, Video

