Papaya Benefits - रिकाम्या पोटी पपई खाणं शरीराला फायदेशीर, जाणून घ्या फायदे

Last Updated:

पपई खाणं शारिरीक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उपाशी पोटी पपई खाल्ल्यानं शरीराची चयापचय क्रिया चांगली राहते.

News18
News18
मुंबई - पपई खाणं तब्येतीसाठी उपयुक्त आहे..त्यातूनही पपई रिकाम्या पोटी खाल्ल्यानं शरीराला
किती फायदे होतात ? जाणून घेऊयात.
पपई तुम्ही कधीही खाऊ शकता, पण तुम्हाला पपईचे अधिक फायदे हवे असतील तर सकाळी
रिकाम्या पोटी पपई खाणं चांगलं. पपई हे प्रामुख्यानं उन्हाळी फळ आहे. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं
शरीरातील पाणी पातळी योग्य प्रमाणात राखता येते. यामुळेच उन्हाळ्यात पपई खाण्याचं प्रमाण जास्त असतं.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी असल्यानं, ते पोट, केस आणि त्वचेसाठी खूप चांगलं मानलं जातं. पपई तुम्ही कधीहीखाऊ शकता, पण तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर सकाळी रिकाम्या पोटी खा.
advertisement
पूर्वजांसारखं जगाल शतायुषी, फक्त जीवनात हा एक बदल महत्त्वाचा, होईल मोठा फायदा
रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय फायदे आहेत ?
  • रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानं पचन प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होते, कारण पपई फायबर युक्त अन्न आहे. यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढते. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे, तुमचा दिवस उत्साहात सुरु होतो कारण यामुळे तुमच्या शरीराचं रोगांपासून संरक्षण होऊ शकतं.
  • रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानं तुमच्या रक्तातील साखरेची पातळी दिवसभर संतुलित राहण्यास मदत होते.
  • पपईमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानंजळजळ कमी होण्यास आणि जुने आजार टाळण्यास मदत होते.
advertisement
  • रिकाम्या पोटी पपई खाणं त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं. यामुळे मुरुम कमी होतात आणि अकाली वृद्धत्व टाळता येतं.
  • रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानं भूक कमी होते आणि तुम्हाला पोट बराचवेळ भरल्यासारखं वाटतं. याच्या मदतीनं वजनही नियंत्रित ठेवता येतं.
  • पपईमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि स्ट्रोक टाळता येतो.
advertisement
त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी, आपल्या आहारात प्रथिनं आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Papaya Benefits - रिकाम्या पोटी पपई खाणं शरीराला फायदेशीर, जाणून घ्या फायदे
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement