Shravan: पोट भरलेलं राहील आणि उपवासही मोडणार नाही! खिचडी, वड्यांपेक्षा भारी उपाय

Last Updated:

जर कडक उपवास पाळला, तर साधारणपणे सुरुवातीचे 2-3 तास काही वाटत नाही, पण नंतर खूप थकायला होतं. त्यात सध्या वातावरणही सतत बदलतंय.

शरीर अजिबात डिहायड्रेटेड व्हायला नको.
शरीर अजिबात डिहायड्रेटेड व्हायला नको.
अनंत कुमार, प्रतिनिधी
गुमला : 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. या महिन्याच्या सोमवारी अनेकजण उपवास पाळतात, महादेवांची मनोभावे पूजा करतात. शिवाय श्रावणात अनेक सणवार येतात, त्यानिमित्तानंही काहीजणांचे उपवास असतात. काहीजण उपवासाचे पदार्थ खातात, तर काहीजण कडक उपवास पाळतात. त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच आज आपण उपवासाच्या दिवशी फ्रेश कसं राहायचं हे जाणून घेणार आहोत.
advertisement
जर कडक उपवास पाळला, तर साधारणपणे सुरुवातीचे 2-3 तास काही वाटत नाही, पण नंतर खूप थकायला होतं. त्यात सध्या वातावरणही सतत बदलतंय. अशावेळी आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
डॉ. राजू कच्छप सांगतात, उपवासामुळे शरिरात डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी, साखर कमी होऊ देऊ नये. नाहीतर ऊर्जा राहणार नाही. मग अशावेळी उपवासाला शीतपेय प्यावे, जसं की फळांचा रस, नारळपाणी, इत्यादी. शिवाय आपण फळंही खाऊ शकता.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्यावं. शरीर अजिबात डिहायड्रेटेड व्हायला नको. शरिरात ओलावा असेल तरच मेंदूचं कार्य सुरळीत राहतं. पाणी आणि इतर शीतपेय प्यायल्यानं आपण उपवासाच्या दिवशी छान ऊर्जावान आणि टवटवीत राहू शकता. त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट्सही खाऊ शकता, ज्यातून भरपूर प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळतील, परिणामी पोट भरलेलं राहील.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Shravan: पोट भरलेलं राहील आणि उपवासही मोडणार नाही! खिचडी, वड्यांपेक्षा भारी उपाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement