Dog Care In Monsoon: पावसाळ्यात तुमचा लाडक्या कुत्रा पडू शकतो भयंकर आजारी, याबद्दल तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
अशावेळी प्राथमिक उपचार घेणे आवश्यक असते अन्यथा काही वेळा श्वान दगावतो. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात श्वानांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हा आजार प्रामुख्याने उद्भवतो. या आजारात श्वानांना उलट्या होणे, भूक न लागणे, पोटफुगी, गळ येणे, संडास लागणे असे लक्षणे आढळतात. अशावेळी प्राथमिक उपचार घेणे आवश्यक असते अन्यथा काही वेळा श्वान दगावतो. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबरोबरच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार टाळण्यासाठी श्वानांना घाण पाणी पिऊ न देणे, बाहेरचे खाद्य देण्यास टाळणे गरजेचे आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप राठोड यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
पावसाळ्यात श्वानांना होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी काही महत्त्वाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. श्वानांच्या आहारामध्ये ताजे अन्न द्यावे जेणेकरून त्यांचे आरोग्य स्वस्थ राहील, तसेच घाण पाणी पिऊ न देणे कारण दूषित पाण्यातून अनेक जिवाणू त्यांच्या पोटात जाऊन आजाराला निमंत्रण देऊ शकतात. याबरोबरच बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे. रस्त्यावरील किंवा उघडे खाद्य श्वानांसाठी हानिकारक ठरू शकतात. या दोन्ही गोष्टी टाळल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
advertisement
त्वचेच्या आजारांपासून श्वानांचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यापैकी श्वानांना ओल्या जागेवर किंवा डबक्यातील गढूळ पाण्यात बसून न देणे, ओलावा किंवा दूषित पाणी फंगल इन्फेक्शन किंवा खाज सुटण्यास कारणीभूत ठरू शकतात. एवढी साधी काळजी घेतली तर नक्कीच त्वचेविषयीचे आजार टाळता येतात, असे देखील राठोड यांनी सांगितले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 24, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dog Care In Monsoon: पावसाळ्यात तुमचा लाडक्या कुत्रा पडू शकतो भयंकर आजारी, याबद्दल तुम्हाला माहितीये का?