Hair Care Tips: पावसाळ्यात ओलेच केस बांधून ठेवताय? वेळीच घ्या ही काळजी, होईल फायदा, Video

Last Updated:

पावसामुळं अनेकवेळा आपले केस ओलसर राहतात. ओलसर केस बांधून ठेवले की, केसांच्या विविध समस्या निर्माण होतात.

+
Hair

Hair Care

अमरावती: स्त्रियांचं सौंदर्य हे केसांमुळे खुलून दिसतं, असं आपण नेहमी ऐकतो. काही स्त्रिया आपल्या सौंदर्याची व्यवस्थित काळजी घेतात. पण, काही स्त्रिया त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे फारशी काळजी करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या केसांत वेगवेगळे आजार निर्माण होतात. पावसामुळं अनेकवेळा आपले केस ओलसर राहतात. ओलसर केस बांधून ठेवले की, केसांच्या विविध समस्या निर्माण होतात. पावसात भिजायला प्रत्येकालाच आवडत. त्यामुळे केसांची निगा फारशी राखली जात नाही. मग अशावेळी, केसांची काळजी कशी घ्यावी. त्यासाठी आपण कोणत्या चुका टाळायला हव्यात. याबाबत माहिती सौंदर्यतज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?
याबाबत माहिती देताना सौंदर्यतज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, अनेकवेळा आपण केसांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करतो. पावसाळ्यात पाऊस झाला की, भिजायला सगळ्यांना आवडत. त्यावेळी केसांचे आरोग्य धोक्यात येते. केस जर सतत ओलसर राहत असतील. केसांच्या मुळाशी वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? हे माहीत असणे गरजेचे आहे
advertisement
ओले केस बांधत आहात? तर थांबा 
पुढे त्या सांगतात की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस जर ओले असतील तर ते लगेच बांधू नका. त्यामुळे केसांचा कुबट वास येतो आणि केसांच्या मुळाशी पुरळ येतात. त्याला खाज सुटली की, त्याचे मोठे फोड तयार होतात. त्या फोडांच्या वेदना देखील सहन कराव्या लागतातत्याचबरोबर केसांत कोंडा सुद्धा होऊ शकतो. पावसात भिजल्यानंतरच नाही तर केस धुतल्यानंतर देखील ते कोरडे करणे गरजेचे आहे.
advertisement
ओले केस कोरडे करूनच बांधून घ्यायला पाहिजे. केसांत ओलसरपणा जाणवत असेल तर ते लगेच कोरडे करायला पाहिजेत. केस कोरडे करण्यासाठी तुम्ही  ड्रायर मशीन किंवा फॅनच्या हवेचा वापर करू शकता. केसांचा कुबट वास येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू घेऊन त्याने केस धुवून घेऊ शकता. त्याचबरोबर केसांना कुठलेच तेल वैगेरे वापरू नका, त्यामुळे केसांच्या मुळाशी घाण जमा होऊन आजार निर्माण होतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care Tips: पावसाळ्यात ओलेच केस बांधून ठेवताय? वेळीच घ्या ही काळजी, होईल फायदा, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement