Monsoon Health Tips: पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे डेंगूचा धोका, आजार टाळण्यासाठी आताच फॉलो करा 5 टिप्स
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
डेंग्यू हा खूप घातक आजार असून विषाचा प्रसार एडीस इजिप्ती या डासाच्या मादीमार्फत 12 किलोमीटरपर्यंत होतो. तसेच हा दिवसा चावणारा डास आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरातील कुंडी, कूलर, छतावरील टायर रिकामे डबे यामध्ये पाणी साचू देऊ नका. असेल तर तात्काळ ते पाणी काढून टाका, कारण पावसाळ्यात डेंग्यूचा आजार होण्याची भीती असते. डेंग्यू हा खूप घातक आजार असून विषाचा प्रसार एडीस इजिप्ती या डासाच्या मादीमार्फत 12 किलोमीटरपर्यंत होतो. तसेच हा दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे डेंग्यू आजार टाळण्यासाठी घराच्या अवतीभोवती स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डेंग्यूरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ.राहुल गोसावी यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
पावसाळ्यात डेंग्यू आजार टाळण्यासाठी घरात साचलेले पाण्याचे लार्वा सर्वप्रथम काढणे आवश्यक आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी 24 तास गुडनाईट मशीनचा वापर करावा, मच्छरदाणी लावून झोपले पाहिजे. काही वेळा डेंग्यू गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. डेंग्यू हा तीन प्रकारांमध्ये मोडतो. एक लहान मुलांना ताप येणे, अंगावर लालसर चट्टे येणे, हात, पाय, डोकं दुखणे आणि झोपाळूपणा येणे. दुसरा प्रकार म्हणजे पेशी कमी होणे, प्लेटलेट्सही कमी होऊ शकतात. तसेच शरीरातील पाणी कमी होणे अशा बाबी प्रामुख्याने घडतात. तसेच असे प्रमुख लक्षणे दिसतात.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये डेंग्यू सुरू झाला नाही मात्र नेहमी या दिवसांत अनुभवानुसार डेंग्यूचे खूप सारे रुग्ण येत असतात असे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डेंग्यूचे डास चावतात त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. शाळेत मुलांना फुलपँट घालणे, बूट घालणे आणि शाळेच्या परिसरात देखील छतावर साचलेले पाणी काढले पाहिजे, कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे या बाबींची शिक्षकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 02, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Health Tips: पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे डेंगूचा धोका, आजार टाळण्यासाठी आताच फॉलो करा 5 टिप्स