advertisement

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी झाली योगाची मदत, कोल्हापूरच्या महिलेनं सांगितला अनुभव

Last Updated:

डिप्रेशनमधून बाहेर पडत कोल्हापूरची महिला योगगुरू झालीय. हर्षदा कबाडे यांनी डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा मंत्र सांगितला आहे.

+
डिप्रेशनमधून

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी झाली योगाची मदत, कोल्हापूरच्या महिलेनं सांगितला अनुभव

कोल्हापूर, 25 सप्टेंबर: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योग साधना करणे सर्वांसाठी गरजेचे बनले आहे. मात्र बऱ्याच जणांना योगाचे महत्त्व माहितही नसते आणि पटतही नाही. अशातच कोल्हापुरातील एक महिला योगाबाबत लोकांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन करत आलेली आहे. तर या महिलेचा याच योगा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल आता गौरव करण्यात येणार आहे. हर्षदा कबाडे यांना ह्युमन राईट मिरर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा महाराष्ट्र एक्सलेंस अवॉर्ड 2023 जाहीर झाला आहे.
हर्षदा कबाडे या योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करतात. त्या मूळच्या कर्नाटकातील गोकाक येथील आहेत. तर हर्षदा यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असून पतीच्या नोकरीच्या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला यावे लागले होते. सध्या त्या कोल्हापूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांना एक मुलगा असून तो अकरावीत शिकत आहे.
का देण्यात येणार पुरस्कार ?
महाराष्ट्र एक्सलेंस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार हर्षदा यांना खरंतर त्यांच्या योगा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जाहीर झाला आहे. पूर्णपणे कन्नड भाषिक असून सुद्धा कोल्हापुरात स्थायिक झाल्यानंतर मराठीतून योगाचे अधिकृत शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर पुढे त्या योगाचे महत्त्व लोकांना पटवून देत आहेत. सध्या त्या एक प्रायव्हेट जिम ट्रेनर म्हणून काम करतात. तर एका फिटनेस सेंटरमध्ये काम करत त्या स्वतःही योगा क्लास घेतात. हे करत असतानाच त्यांनी स्वतःचं योगा क्षेत्रातील यूट्यूब चॅनलही काढले आहे. याद्वारे त्या मराठीतून योगाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगत असतात. ह्युमन राईट मिरर या संस्थेने त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन यंदाचा महाराष्ट्र एक्सलेंस पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केलीय.
advertisement
शिक्षण कन्नड आणि योगशिक्षण मराठीत
हर्षदा यांना योगाची आवड लागली आणि त्यांनी योगाचे शिक्षण घ्यायचे ठरवले. मग एमए योगा, सायन्स अँड डीप इन् योगा अशी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. खरंतर संपूर्ण पदवीपर्यंतचे शिक्षण कन्नड भाषेत पूर्ण करुन देखील नंतर योगाचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मराठी भाषेतून घेतले. ही त्यांची एक विशेष बाब आहे.
advertisement
हर्षदा यांना अशी लागली योगाची आवड
खरंतर कर्नाटकातून कोल्हापुरात आल्यानंतर काही कारणास्तव हर्षदा या स्वतः डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. त्या परिस्थतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी योगाचे शिक्षण घेण्याचे ठरवले होते. यावेळी त्यांनी स्वतःला योगाच्या मदतीने डिप्रेशन मधून बाहेर काढले. तेव्हाच त्यांना योगाचे महत्व समजले होते. त्यावेळी इतरांच्या आयुष्यातील समस्या कमी करण्यासाठी आपण योगाची मदत घेऊ शकतो, हेही त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच तेव्हापासून त्यांनी योगाच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले.
advertisement
असा होणार पुरस्कार वितरण कार्यक्रम
काहीच दिवसात नवी मुंबईत होणारा ह्यूमन राईट मिरर प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलेंस अवॉर्ड २०२३ हा हर्षदा यांना दिला जाणार आहे. बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास बॉलिवूड अभिनेत्री पूनम कपूर यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल.
advertisement
दरम्यान, योग क्षेत्रातील हर्षदा यांचा पहिलाच पुरस्कार असल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तर मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून हर्षदा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी झाली योगाची मदत, कोल्हापूरच्या महिलेनं सांगितला अनुभव
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement