मधुमेहासाठी गुणकारी, रोज प्या एक कप पाणी, जायफळाचे आणखी फायदे काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे.
छत्रपती संभाजीनगर : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळामध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. तर या जायफळाचे आपल्याला कशी पद्धतीने फायदे होतात किंवा आपण कुठल्या माध्यमातून जायफळ घेऊ शकतो? याबद्दल आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
जायफळाच्या थोड्याशा सेवनाने आठ ते दहा प्रकारच्या व्याधी या बऱ्या होतात. जायफळामध्ये खनिजे जास्त असतात. या खनिजांमध्ये मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतं. ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. आपण प्रत्येक जण पुरण केले की त्यामध्ये जायफळ टाकत असतो. त्याचं कारण असं की हरभऱ्याची डाळ असते. त्याच्यामध्ये दाह मोठ्या प्रमाणात असतो. हा दाह कमी करण्यासाठी जायफळ टाकल्याने कमी होतो, असं आहार तज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात.
advertisement
रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जायफळाचा वापर हा केला जातो. ज्यांना मधुमेह आहे अशांनी जर रोज सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक कप पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये जायफळाची पावडर किंवा उकाळून जर ते पाणी घेतलं तर त्यामुळे इन्सुलिनची क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते. मात्र जायफळाची मात्रा योग्य प्रमाणात पाहिजे. ज्यांना हृदयविकार आहेत आणि त्यांचे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे अशांनी जर जायफळाचे पावडर आणि दालचिनीची पावडर एकत्र करून त्याचे सेवन केले तर हृदयावरील आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते.
advertisement
ज्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, चेहरा डल झालेला आहे, कोणते डाग आहेत अशांनी जायफळ चेहऱ्यावरती लावावे. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावे. सगळे पिंपल्स आणि डाग जायला मदत होते. झोप लागत नसेल, खूप ताण असेल तसेच खूप अभ्यास करायच असेल तर दुधामध्ये थोडसं जायफळ घेतले तर तुमचे हे सर्व ताण जातात. ज्यांना अॅसिडिटी आहे त्यांनी सुद्धा दुधामध्ये जायफळ टाकून घेतलं तर मदत होते. त्याचा सोबत जर ज्यांना युरीन साफ होत नसेल यांनी पण जायफळ घ्यायला पाहिजे. असे जायफळाचे विविध फायदे हे होतात, असंही आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 01, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मधुमेहासाठी गुणकारी, रोज प्या एक कप पाणी, जायफळाचे आणखी फायदे काय? Video