Health Tips: कांदे-बटाटे एकत्र ठेवण्याची चूक पडेल महागात, आरोग्यावर होतील असे घातक परिणाम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
कांदे आणि बटाटे प्रत्येक घरात हमखास वापरले जातात. मात्र या दोन्ही भाज्या पावसाळ्यात योग्य प्रकारे साठवल्या नाहीत, तर आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.
मुंबई : पावसाळा सुरू झाला की घरात भाजीपाला साठवण्याची चिंता वाढते. विशेषतः कांदे आणि बटाटे प्रत्येक घरात हमखास वापरले जातात. मात्र या दोन्ही भाज्या पावसाळ्यात योग्य प्रकारे साठवल्या नाहीत, तर आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. डॉ. पी.पी. यादव यांच्या माहितीनुसार कांदे आणि बटाटे एकत्र ठेवल्यास त्यामध्ये सॉलानिन (Solanine) नावाचे विषारी संयुग तयार होऊ शकते, जे गंभीर अन्नविषबाधेला कारणीभूत ठरू शकते.
कांदे आणि बटाटे एकत्र का ठेवू नयेत?
कांदे आणि बटाट्यांचे साठवणुकीचे गुणधर्म वेगळे असतात. बटाटे अंधारात ठेवल्यास त्यावर हिरवा थर तयार होतो, ज्यामध्ये सॉलानिन निर्माण होते. जर हे बटाटे ओलसर कांद्यांच्या संपर्कात आले, तर सडण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. एकत्र ठेवल्याने दोन्ही भाज्यांमध्ये उष्णता आणि ओलावा निर्माण होतो, जे विषारी घटक वाढवते.
advertisement
प्लास्टिक पिशवीत कांदे-बटाटे ठेवू नयेत
प्लास्टिक पिशवीत हवा खेळती राहत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दमट हवामानात पिशवीतील कांदे-बटाटे लवकर खराब होतात. प्लास्टिकमुळे ओलावा साचतो आणि बुरशी, कुज, वास यांचे प्रमाण वाढते. या प्रकारची भाजी खाल्ल्यास अपचन, उलट्या, आणि विषबाधा होऊ शकते.
advertisement
पावसाळ्यात कांदे आणि बटाट्यांची काळजी कशी घ्यावी?
1) वेगळे ठेवा: कांदे आणि बटाटे वेगळ्या टोपल्या किंवा जाळीच्या पिशव्यांमध्ये ठेवा.
2) हवा खेळती ठेवा: दोन्ही भाज्यांना हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवा. अंधाऱ्या, थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवणे योग्य.
3) ओलसर कांदे/बटाटे बाजूला काढा: जर एखादा कांदा किंवा बटाटा ओलसर वाटत असेल तर तो तातडीने वेगळा करा.
advertisement
4) नेहमी तपासा: आठवड्यातून एकदा तरी साठवलेले कांदे-बटाटे तपासा. कुजलेले किंवा मऊ झालेले भाग लगेच काढून टाका.
5) प्लास्टिकऐवजी जाळीच्या पिशव्या वापरा: पावसाळ्यात प्लास्टिक टाळा. जाळीच्या पिशव्यांमुळे हवा खेळती राहते.
सावधगिरी हीच सुरक्षा
पावसाळ्याच्या काळात साठवणुकीसाठी थोडी अधिक काळजी घेतल्यास अन्नविषबाधा, सडलेला भाजीपाला, वायफळ खर्च आणि आरोग्य धोक्यांपासून आपण वाचू शकतो. त्यामुळे घरातील महिलांनी आणि गृहिणींनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: कांदे-बटाटे एकत्र ठेवण्याची चूक पडेल महागात, आरोग्यावर होतील असे घातक परिणाम