Health Tips: उठलं की मोबाईल, झोपलं की मोबाईल, सारखं स्क्रीन पाहिल्यामुळे शरिरात होतो असा भयानक बदल!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
शिक्षण, काम, मनोरंजन आणि सोशल मीडियासाठी वापरले जाणारे मोबाईल आता अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र या उपकरणाचा अतिवापर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने घातक ठरतो आहे.
बीड: स्मार्टफोन हे आजच्या युगात अपरिहार्य साधन झाले असले तरी त्याचा अतिरेक आरोग्य आणि जीवनशैलीवर गंभीर परिणाम घडवतो आहे. शिक्षण, काम, मनोरंजन आणि सोशल मीडियासाठी वापरले जाणारे मोबाईल आता अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र या उपकरणाचा अतिवापर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने घातक ठरतो आहे. बीड जिल्ह्यातील डॉ. योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईलचा अतिवापर होत असेल तर याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते असं ते म्हणतात.
मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्वप्रथम होणारे परिणाम म्हणजे डोळ्यांचे आजार, डोकेदुखी, झोपेच्या तक्रारी आणि पाठदुखी. दिवसभर स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डिजिटल आय स्ट्रेन होतो, ज्यामुळे डोळ्यांत कोरडेपणा, धूसर दिसणे आणि वेदना जाणवू शकतात. तसेच झोपेच्या वेळेपूर्वी मोबाईलचा वापर केल्यास मेंदूवर परिणाम होतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होते, हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
advertisement
याशिवाय, मोबाईलच्या सततच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. सोशल मीडियावरील सततची तुलना, लाइक्सची अपेक्षा आणि माहितीचा सतत ओघ यामुळे चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. किशोरवयीन मुलांमध्ये तर ही समस्या अधिक गंभीर आहे. तज्ज्ञ सांगतात की मोबाईलच्या अतिवापरामुळे डोपामिन इफेक्ट निर्माण होतो ज्यामुळे व्यसनाधीनतेसारखी स्थिती उद्भवते.
advertisement
सामाजिक पातळीवरही याचे परिणाम दिसून येतात. एकाच घरात राहूनही संवाद कमी झाला आहे. कुटुंबात एकत्र बसून गप्पा मारण्याऐवजी प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यांवर मोबाईल वापरत चालणे किंवा वाहन चालवणे हे अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
एकंदरीत मोबाईलचा अतिरेक हा काळजीचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईल वापरावर मर्यादा घालून आरोग्य आणि नातेसंबंधांचे जतन करणे आवश्यक आहे. ठराविक वेळाने डिजिटल डिटॉक्स घेणे, स्क्रीन टाइम नियंत्रित करणे आणि खऱ्या संवादाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. मोबाईल हा साधन आहे जीवन नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
July 23, 2025 7:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: उठलं की मोबाईल, झोपलं की मोबाईल, सारखं स्क्रीन पाहिल्यामुळे शरिरात होतो असा भयानक बदल!

