हिवाळ्यात केसांची काळजी घेतांना या 7 चुका अजिबात करू नका, अन्यथा होईल पश्चात्ताप
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळ्यात त्वचा आणि केस दोन्हीच्या समस्या निर्माण होतात. त्याची योग्य काळजी न घेतल्यास समस्या वाढीस लागते आणि मग त्यावर उपाय काम करत नाहीत. त्यामुळे हिवाळा सुरू होताच केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळा सुरू झाला की त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. योग्य काळजी न घेतल्यास त्या समस्या वाढतात आणि मग त्यावर लवकरात लवकर कोणतेही उपाय चालत नाहीत. म्हणून हिवाळा सुरू होताच आपल्या केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?
याबाबत लोकल 18 ने त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्या सांगतात की, हिवाळ्यात केस कोरडे होतात, त्यामुळे केसांत मॉइश्चरायझर मेन्टेन करणे गरजेचे असते. त्यासाठी केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांत खोबऱ्याचे तेल लावावे. त्यामुळं केस कोरडे होणार नाहीत. माइल्ड शाम्पूने केस धुवायचे. केसांत कोंडा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने शाम्पू वापरू शकता. उन्हात धुळीत जातांना केस कापडाने बांधून जावे. यामुळे तुमचे केस व्यवस्थित राहतील.
advertisement
त्याचबरोबर योग्य आहार सुद्धा घेणे महत्वाचे आहे. दररोज एक फळ खावे. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य खाणे गरजेचे आहे. यामुळे केसांचे आरोग्य सुधारित राहते.
या चुका टाळाव्यात
1. हिवाळ्यात केस गळतात, गुंततात त्यामुळे केस मोकळे ठेवू नये.
2. बाहेर जातांना केसांना उघडे ठेवू नये. कापड गुंडाळून जावे, त्यामुळे बाहेरील धूळ केसांवर येणार नाही आणि केस व्यवस्थित राहतील.
advertisement
3. खूप वेळ खोबरेल तेल डोक्याला लावून ठेवू नये. अंघोळीच्या आर्धा तास आधी तेल लावावं.
4. अती गरम पाण्याने केस धुवू नये, कोमट पाण्यात केस धुवावे.
5. गुंतलेले केस एकदम जोरात ओढू नये, हळूहळू गुंता काढावा.
6. रात्री झोपताना केस मोकळे सोडू नये. त्यामुळे केस तुटतात, केसांवर धूळ जमा होते.
advertisement
7. नेहमी नेहमी केस धुवू नये, आठवड्यातून दोनदा केस धुवावे.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 13, 2024 1:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात केसांची काळजी घेतांना या 7 चुका अजिबात करू नका, अन्यथा होईल पश्चात्ताप

