advertisement

Appendicitis: 'अपेंडिक्स' म्हणजे पोटात नेमकं होतं काय? कशामुळे होतो हा आजार?

Last Updated:

डॉ. धीरज राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेंडिक्सच्या त्रासात सामान्यत: पोटाच्या उजव्या भागात प्रचंड वेदना होतात. यादरम्यान पोट एवढं दुखतं की, सहज उठणं-बसणंही अवघड होतं. तसंच या आजाराची इतरही काही लक्षणं जाणवतात. 

News18
News18
रोहित भट्ट, प्रतिनिधी 
अल्मोडा : आजकाल वाढत्या प्रदूषणात, धावपळीच्या जीवनात साठीतले आजार अगदी विशीतच जडतात. मग या आजारांवर उपचार करण्यासाठी सतत रुग्णालयांचे खेटे मारावे लागतात. सध्या अपेंडिक्सही मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतोय. अपेंडिक्स म्हणजे नेमकं होतं काय आणि कशामुळे हा आजार होतो, याबाबत अनेकजणांना माहिती नसते. डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया.
डॉ. धीरज राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेंडिक्सच्या त्रासात सामान्यत: पोटाच्या उजव्या भागात प्रचंड वेदना होतात. यादरम्यान पोट एवढं दुखतं की, सहज उठणं-बसणंही अवघड होतं. तसंच या आजाराची इतरही काही लक्षणं जाणवतात.
advertisement
उलटीसारखं होणं, भूक न लागणं, हलका ताप येणं ही लक्षणं अपेंडिक्समध्ये प्रामुख्यानं जाणवतात. अपेंडिक्स प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लहान आणि मोठ्या आतड्यांदरम्यान असतो. त्याचा आकार अगदी बोटाएवढाच असतो. जेव्हा त्याला सूज येते तेव्हा या स्थितीला 'अपेंडिसायटिस' म्हणतात. ही समस्या त्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते जे संतुलित आहार घेत नाहीत आणि जास्त जंक फूड खातात. तसंच कमी फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यानं आणि पुरेसं पाणी न प्यायल्यानंदेखील हा आजार होऊ शकतो. 
advertisement
डॉ. धीरज राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेंडिक्सवर आराम मिळवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेशही असायला हवा. तसंच ताजी फळं आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खाव्या. अति मसालेदार पदार्थ खाऊ नये. साधा आणि संतुलित आहार घ्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Appendicitis: 'अपेंडिक्स' म्हणजे पोटात नेमकं होतं काय? कशामुळे होतो हा आजार?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement