चुकीचे प्रॉडक्ट त्वचेला पोहोचवतील हानी, उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता तापमानवाढीमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी सनस्क्रिन वापरण्याकडे कल वाढतो. तर सनस्क्रीन वापरताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत? याबाबत माहिती जाणून घेऊ.
प्रगती बहुरूपी, प्रतिनिधी
अमरावती : उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढीमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण, सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत. काही वेळा व्यस्त सनस्क्रीन घेण्याच्या नादात आपण पैसे वाया घालवतो. कमी दर्जाच्या सनस्क्रीन आपल्याकडील त्वचेवर कोणताही चांगला परिणाम करत नाही. त्यामुळे सनस्क्रीन वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? याबाबत माहिती डॉ. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा सांगतात की, उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या पुढे असतो. तेव्हा अनेकांकडून सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. पण, त्यासाठीही काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सनस्क्रीन घेऊ नये. कारण आपल्या त्वचेचा प्रकार आपल्याला माहीत नसतो आणि चुकीचे प्रॉडक्ट आपल्या त्वचेला हानी पोहोचवतात. तेलकट त्वचेसाठी वेगळे सनस्क्रीन असतात आणि नॉर्मल, कोरड्या त्वचेसाठी वेगळे सनस्क्रीन असतात. त्यामुळे डॉक्टरांना दाखवूनच सनस्क्रीन खरेदी करा.
त्याचबरोबर SPF 10 किंवा SPF 15 असणारे सनस्क्रीन आपल्याकडील उन्हाळ्यात काहीही कामाचे नसतात. ते केवळ मानसिक समाधान असते की सनस्क्रीन लावलेलं आहे. ते कमी दर्जाचे असल्याने त्यात फक्त आणि फक्त पैसे वाया घालवणे आहे. त्यामुळे सनस्क्रीन खरेदी करताना विचारपूर्वक खरेदी करा.
advertisement
त्यानंतर आपण काय काम करतो? बाहेर किती वेळ राहतो? यावर सुद्धा तुमचे सनस्क्रीन खरेदी करणे अवलंबून आहे. तुमचा स्क्रीन टाईम जास्त असल्यास तुम्हाला वेगळे सनस्क्रीन घ्यावे लागेल. आणखी महत्त्वाचे म्हणजे सनस्क्रीन आपल्या त्वचेवर फक्त 2 ते 3 तासच काम करतं. त्यामुळे 3 तासानंतर सनस्क्रीन चेहऱ्यावर लावणे गरजेचे आहे. सनस्क्रीन वापरताना या सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
March 22, 2025 7:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चुकीचे प्रॉडक्ट त्वचेला पोहोचवतील हानी, उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Video